आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींचे न्यूड सेल्फी चोरणा-यांपासून NASA ला त्रस्त करणा-यापर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल - इंटरनेट, तंत्रज्ञान आणि संवादाने मानवी आयुष्य दिवसेंदिवस आणखी सोपे होत आहे. पण, काहींसाठी हेच तंत्रज्ञान एक घातक शस्त्र आहे. आपल्या हातातील मोबाईल किंवा घरातील कंप्युटर केवळ आपल्याच नियंत्रणात असल्याचे वाटत असेल तर तो निव्वळ एक गैरसमज आहे. आम्ही अशा काही हॅकर्स आणि सायबर हल्लेखोरांबद्दल बोलत आहोत जे तुमचे आमचे मोबाईल आपल्यालाही न कळता सहज हॅक करून शकतात. यांच्यासाठी जगातील सर्वात नावाजलेली स्पेस एजंसी नासाचे संगणक हॅक करणे अवघ्या काही मिनिटांचा खेळ आहे. जोनाथन जेम्समुळे नासाला आपले नेटवर्क 3 आठवडे बंद ठेवावे लागले. तर रियान कॉलिन्सने प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्रींच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून त्यांचे न्यूड फोटो हॅक करून लीक केले होते.

 

सिलेब्सचे न्यूड फोटो लीक करणारा रियान कॉलिन्स
रियान कॉलिन्सला जगातील सर्वात घातक हॅकर मानले जाते. WashingtonTimes च्या एका वृत्तानुसार, रियानने Hunger Games आणि X Men ची अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि केट अपटन सारख्या सेलिब्रिटीजचे न्यूड फोटोज त्यांच्याच मोबाईलमधून लीक केले होते. यासाठी त्याला शिक्षा देखील झाली. त्याने सेलिब्रिटीजचे आयफोन आणि गुगल पासवर्ड चोरून घरबसल्या त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ आपल्याकडे डाऊनलोड केले. त्यामध्ये डिलीट केलेल्या न्यूड फोटोजचा देखील समावेश होता. साऱ्या हॉलिवूड जगतात त्याच्या नावाची भिती पसरली होती.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नासाच्या नाकी नऊ आणणारा व इतर घातक हॅकर्सबद्दल...

बातम्या आणखी आहेत...