आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात आधुनिक जेल, जेथे कैद्यांवर नियंत्रणासाठी शस्त्रांची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हे छायाचित्र ग्रीनलंडची राजधानी नूक येथे बनवल्या जाणाऱ्या जगातील सर्वात आधुनिक तुरुंगाचे आहे. विशेष म्हणजे, ही जेल एक खुले तुरुंग असून त्याला एन अॅनस्टेलट असे नाव देण्यात आले आहे. 2019 मध्ये जेल पूर्णपणे तयार होणार आहे. या तुरुंगात तीन स्टेज सुरक्षा यंत्रणा आहे. येथे सुरक्षा रक्षकांना बंदूक ठेवून पहारा देण्याची गरज भासणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे, यात कैद्यांना सुधरण्याची संधी दिली जाणार आहे. ते या तुरुंगातून एकटेच बाहेर ये-जा करू शकतील. 

 

- 86 हजार चौरस फुटांत बांधलेल्या या इमारतीमध्ये 76 सेल आहेत. त्यामध्ये 40 कैदी बंद आणि 36 कैदी खुले ठेवले जातील. बंद सेलमध्ये घातक आणि कुख्यातांना ठेवले जाईल. एकाचवेळी या ठिकाणी 400 कैदी ठेवले जाऊ शकतात. 
- या तुरुंगात येणाऱ्या कैद्यांना सुधरण्यासाठी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. काही कैद्यांना दिवसा बाहेर जाऊन काम करण्याचीही संधी दिली जाईल. 
- कैद्यांना शहरात जाऊन पैसे कमवून संध्याकाळी परत तुरुंगात यावे लागेल. कैद्यांना येथे आल्यानंतर आपल्याला शिक्षा दिली जात आहे असे वाटू नये हा यामागचा हेतू आहे. 

जेलमध्येच शाळा, ग्रंथालय, मैदान आणि चर्च
जेलमध्ये कैद्यांना शाळा, लायब्रेरीसह स्पोर्ट्स कॉमप्लेक्स आणि चर्च देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्रीनलंड यूरोपीय-अटलांटिक परिसरात आहे. येथे इतर देशांच्या तुलनेत कैद्यांची संख्या जास्त आहे. 1950 च्या दशकात लोकांनी गावातून शहरांकडे पलायन सुरू केले होते. शहरीकरणामुळे गुन्हेगारी वाढली असे म्हटले जाते. 

 

3 लेव्हलचे संरक्षण
या तुरुंगाला आर्किटेक्ट थॉमस रूस यांनी डिझाईन केले आहे. या तुरुंगात सर्वच भिंती काचेच्या आहेत. जेणेकरून ते बाहेरचे दृश्य सहज पाहू शकतील. जेलमध्ये तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा आहे. सर्वच कैद्यांना एक परिसरातून नियंत्रित केले जाऊ शकते. गरज पडल्यास त्यांना एकत्रित आणणे आणि वेगळे करणे असे दोन्ही प्रकार शक्य आहेत. तुरुंगातील सिस्टिम इतके सुरक्षित आहे, की गार्ड्ला बंदूका बाळगण्याची गरज नाही असा दावा केला जात आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अत्याधुनिक तुरुंगाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...