आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच शहरात मारले गेले 39 भारतीय, ISIS पासून मुक्तीनंतर अशी आहे अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोसूल - इराकचे मोसूल शहर 9 महिन्यांपूर्वीच जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसपासून मुक्त झाले आहे. इराकचे दुसरे सर्वात मोठे शहर मोसूलला दहशतवाद्यांनी आपली या देशातील राजधानी घोषित केले होते. तीन वर्षे या शहरावर आयसिसचा ताबा होता. त्यावेळी येथे आयसिसकडून झालेल्या अमानवीय अत्याचारांची जगभरात चर्चा झाली. याच शहरात दहशतवाद्यांनी आपल्या तावडीत असलेल्या 39 भारतीय नागरिकांचा बळी घेतला होता. 

 

- मोसूलमध्ये आता सामान्य जीवन सुरळीत होत आहे. एकेकाळी शहर, गाव आणि घर सोडून गेलेले लोक आता परत येत आहेत. स्थानिक बाजारपेठा पुन्हा बहरण्यास सुरुवात झाली आहे. 
- कित्येक बंद पडलेल्या शाळा पुन्हा उघडल्या जात आहेत. ठिक-ठिकाणी घरांची डागडुजी आणि दुकानांची कामे सुरू आहेत. 
- ईस्ट मोसूलमध्ये 437 शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच शाळांपासून वंचित झालेल्या 450,000 मुलांचे शिक्षण पुन्हा सुरळीत होत आहे. वेस्ट मोसूलमध्ये 110 शाळा आहेत. त्या ठिकाणी 81 हजार विद्यार्थी पुन्हा शिक्षण घेतील. 
- यूएनच्या एका अहवालानुसार, मोसूल शहरातून पसार झालेल्या 10 लाख लोकांपैकी सव्वा तीन लाख नागरिक शहरात परतले आहेत. जमीनदोस्त झालेल्या घरांमध्ये ते आपल्या घरट्यांच्या खुणा शोधत आहेत. शहर पुनरस्थापित करण्यासाठी 65 अब्ज रुपयांचा खर्च येईल असा अंदाज आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या शहराच्या आतील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...