आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAMADAN SPL: या देशात सर्वात मोठा 22 तासांचा रोजा; हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेजाविक - जगभरात रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा पाळत आहेत. यात काही न खात आणि न पिता दिवस काढावा लागतो. रोजा पाळण्यासाठी असलेले दिवसातील तास विविध ठिकाणी कमी किंवा जास्त असू शकतात. ही प्रक्रिया सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या जवळपास असते. पण, भारतात उन्हाळ्याने लोकांना 14.5 ते 15 तासांपर्यंत रोजा पाळावा लागत आहे. पण, आर्कटिक सर्कलमध्ये असलेल्या आइसलंडमध्ये लोक सर्वाधिक 22 तासांचा रोजा पाळावा लागत आहे. कारण, या ठिकाणी रात्र फक्त 2 तासांचीच आहे. नागरिकांना काही पर्याय देण्यात आले आहेत.


- सद्यस्थिताला आइसलंडमध्ये मध्यरात्री 12 वाजता सूर्य मावळतो. तसेच अवघ्या 2 तासांतच पुन्हा सूर्य उगवतो. त्यामुळे, 2 तासांची रात्र आणि 22 तासांचा दिवस झाला आहे. 
- अशात मुस्लिम समुदाय सरासरी 21 तास 51 मिनिटांचा रोजा करत आहेत. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात 14 जूनला येथे सूर्य रात्री 11 वाजून 57 मिनिटाला मावळणार आहे.
- अशात आर्कटिक सर्कलमध्ये येणाऱ्या देशातील रोजेदारांना इस्लामिक अभ्यासक आणि संस्थांनी काही पर्याय दिले आहेत. जेणेकरून त्यांना होणारा त्रास कमी करता येईल. 
- यामध्ये स्थानिक आस-पासच्या देशांमध्ये पाळल्या जाणाऱ्या रोजाची वेळ लागू करू शकतात. उदाहरणार्थ त्यांना हवे असल्यास ते सौदी अरेबियात रोजाची वेळ पाळू शकतात. यासाठी कुणावरही बंधने नाहीत. ते स्थानिक वेळेनुसार, 22 तासांचा रोजा सुद्धा करू शकतील.
- देशातील राजधानीत मशीदींमध्ये रोजासाठी स्थानिक वेळ पाळली जात आहे. तर इतर मशीदी प्रामुख्याने युरोपियन देशातील वेळ फॉलो करत आहेत. 
- जानेवारी 2018 च्या आकडेवारीनुसार, येथील 67 टक्के लोक चर्च ऑफ आइसलंडचे अनुयायी असून 11.56 टक्के लोक इतर ख्रिस्ती धर्मीय आहेत. 6.7 टक्को लोक नास्तिक आहेत. तर इस्लाम धर्मियांची संख्या फक्त 0.30 टक्के इतकी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...