आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOCKING: येथे प्रवेश करण्यासाठी काढावे लागतात कपडे; असे आहे न्यूड रेस्टॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - माणसाची ओळख त्याच्या पेहरावावरूनच होते असे म्हटले जाते. पण, फ्रान्समध्ये एक अनोखे रेस्टॉरंट आहे जेथे ग्राहकांना तर काय स्टाफला सुद्धा कपडे घालण्याची परवानगी नाही. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य येथील जेवण किंवा खास डिश नाही तर येथे येणारे ग्राहक आहेत. रेस्टॉरंटमध्ये प्रवेशच कपडे नाही   घालण्याच्या अटीवर दिला जातो. O' Natural असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. माइक आणि स्टेफनी या कपलने सुरू केलेला हा बिझनेस फ्रान्समध्ये मोकळेपणाला प्रोत्साहित करत आहे.


अश्लीलता नको...
> न्यूड रेस्टॉरंट असले तरीही येथे येणाऱ्या ग्राहकांना काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. येणाऱ्या प्रत्येकाला आधीच या नियमांची माहिती दिली जाते.
> लोकांना या रेस्टॉरंटमध्ये येण्यापूर्वी रितशीर रिझर्वेशन करावे लागते. ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वीच लोकांना एक वॉर्निंग दिली जाते, की हे एक जेवण्याचे ठिकाण आहे. येथे अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. 
> रेस्टॉरंटमध्ये प्रवेश घेताच त्यांना थेट रेस्टरूममध्ये पाठवले जाते. तेथे ग्राहकांना आपले सर्व कपडे काढून ठेवावे लागतात. ग्राहकांना येथे अंडरगार्मेंट सुद्धा घालण्याची परवानगी नाही. यानंतर त्यांना पायात घालण्यासाठी कागदाच्या चप्पल दिल्या जातात. 
> केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर ब्रिटन, जपान आणि जर्मनीत सुद्धा अशा प्रकारचे न्यूड रेस्टॉरंट आहेत. स्वतःला विसरून मोकळेपणाने राहणे हा या रेस्टॉरंट आणि हॉटेलांचा हेतू आहे. अनेक ठिकाणी त्यावर टीका केली जात असली तरीही हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही.


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...