आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्समध्ये असतात इतके निर्बंध, तरुणींनी व्यक्त केल्या भावना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - नेपाळमध्ये महिन्याच्या 'त्या' दिवसांत कथित परमपरेचे पालन करताना एका तरुणीचा जीव गेला आहे. त्यामुळे, या देशात पीरियड्समध्ये महिलांवर लावल्या जाणारे निर्बंध पुन्हा चर्चेत आले आहेत. यात पीरियड्स येताच तरुणी आणि महिलांना घराबाहेरच्या एका झोपडीत रात्र घालवण्यासाठी विवश केले जाते. त्या झोपडीतच रात्री थंडीपासून वाचण्यासाठी तिने शेकोटी पेटवली होती. त्या शेकोटीने झोपडीतच गुदमरून तिचा मृत्यू झाला आहे. 

   

नेमकी कशी आहे ही प्रथा..?
>> नेपाळमध्ये अनेक शहर आणि गावांत ठिक-ठिकाणी मुलींना पीरियड्स येताच 'छौपदी' प्रथेला सामोरे जावे लागते. 
>> यात त्यांना घरातील कंघवा, आरसा वापरणे तर सोडाच मुलींना आपल्या घरात राहण्याची परवानगी सुद्धा दिली जात नाही. 
>> छौपदीचा शब्दश: अर्थ अस्पृश्य असा आहे. ही प्रथा नेपाळमध्ये गेल्या कित्येक शतकांपासून सुरू आहे. या प्रथेमध्ये मुलींना पीरियड्स आल्यानंतर अथवा बाळ जन्माला घातल्यानंतर (डिलिव्हरीनंतर) अपवित्र मानले जाते.
>> पीरियड्स आणि डिलिव्हरीनंतर अशा तरुणी आणि महिलांना अनेक प्रकारच्या निर्बंधांना सामोरे जावे लागते. पीरियड्स येताच त्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. आपल्या आई-वडिलांना ती स्पर्श सुद्धा करू शकत नाही.
>> त्यांना स्वयंपाक करू दिले जात नाही. शाळेत पाठवले जात नाही. तसेच जेवणात फक्त खारे ब्रेड आणि भात दिला जातो. 
>> एवढेच नव्हे, तर ऋषी पंचमी फेस्टिवलमध्ये अंघोळ करून महिला स्वतःला कथितरीत्या पवित्र करून घेतात. 
>> ऋषी पंचमी फेस्टिवलमध्ये अंघोळ करतानाच त्या तरुणी आणि महिला आपल्या पापांची माफी मागतात. छौपदी प्रथेला सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्येच बेकायदेशीर घोषित केले. तरीही गुप्तरित्या अशा प्रथा विविध गावांमध्ये आजही पाळल्या जातात. 
>> हिंदू धर्माशी या प्रथेचा संबंध जोडला जातो. या प्रथेचे पालन करण्यास नकार देणाऱ्यांना शिक्षा देण्याचा सुद्धा उल्लेख आहे. 
>> शिक्षाही अशी की एखाद्या महिला किंवा तरुणीने प्रथेला नकार दिल्यास त्यांच्या कुटुंबियांना मृत्यूदंड देखील देण्याची परमपरा आहे.
>> ही प्रथा मानणाऱ्या लोकांच्या मते, पीरियड्समध्ये एखाद्या तरुणीने अन्नधान्याला हात लावल्यास संपूर्ण शेती बर्बाद होते. तसेच स्वतःच्या हाताने पाणी घेऊन पिल्यास दुष्काळ येतो. एवढेच नव्हे, तर त्यांनी कच्च्या फळाला हात लावल्यास ते पिकत नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या प्रथेला दरमहा सामोरे जाणाऱ्या तरुणींच्या भावना...

बातम्या आणखी आहेत...