आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात अाता कार, रेल्वेतून सिगारेटची थाेटके फेकणे गुन्हा; नवा अाग सुरक्षा नियम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्काे- रशियात अाता कार चालवताना सिगारेट पिऊन त्याची थाेटके फेकणे गुन्हा मानला जाणार असून, नवीन अाग सुरक्षा नियमानुसार असे केल्यास दाेषीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार अाहे. रशियात गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान अागीच्या ९५ हजार घटना घडल्या. त्यात ५,२००हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणांच्या तपासात सिगारेटच्या जळत्या थाेटकांमुळे अनेक ठिकाणी अागीच्या घटना घडल्याचे वा तशी परिस्थिती उदभवल्याचे निष्पन्न झाले. या घटनांतून धडा घेऊन सरकारने अाग सुरक्षेचे नवीन नियम लागू केले अाहेत.

या नियमांनुसार कार किंवा रेल्वेतून सिगारेटची थाेटके बाहेर फेकणे गुन्हा मानला जाईल. रशियाच्या अापत्कालीन स्थिती मंत्रालयाने साेमवारी अाग सुरक्षेचे नवे दिशानिर्देश जारी केले. सिगारेटची थाेटके फेकणे, ही भलेही लहान चूक असेल; परंतु यामुळे एखादी माेठी दुर्घटना घडू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे अाहे.


सिगारेटच्या थाेटकांमुळे अाग तर लागतेच; परंतु ते नष्ट हाेण्यास अनेक वर्षे लागतात व यामुळे पर्यावरणाचे माेठे नुकसान हाेते. पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी दुरुस्ती केलेले हे नवे नियम संकेतस्थळावर जाहीर केले. या नियमांनुसार घरमालकांना त्यांच्या बगिच्यातील व लाॅन्सचे गवत नियमितपणे कापावे लागणार अाहे. तसेच झाडांची पाने अादी काेरडा कचरादेखील दर अाठवड्याला स्वच्छ करावा लागेल.यामुळे वाढल्या अागीच्या घटनाअाग सुरक्षा विभागात झालेली माेठी कर्मचारी कपात, अापत्कालीन स्थिती विभागातील अधिकाऱ्यंचा चालढकलपणा, अाग सुरक्षा कर्मचाऱ्यांना बचाव व मदतकार्याचे याेग्यरीत्या प्रशिक्षण न मिळणे ही अागीच्या घटना घडण्यामागील कारणे असल्याचे रशियाच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले.


जगभरात सिगारेटच्या थाेटकामुळे निर्माण हाेताे १२ लाख टन कचरा

जगभरात दरवर्षी सुमारे ६०० अब्ज सिगारेटच्या थाेटकांचे (बट्स) उत्पादन हाेते. यामुळे १२ लाख टनांहून अधिक कचरा निर्माण हाेताे. पुढील ७ वर्षांत जगात ९०० अब्ज बट्ची मागणी असेल, असा अंदाज अाहे. 

 

सिंगापुरात सर्वाधिक १५ हजारपर्यंत दंड
धावत्या कारमधूून सिगारेटची थाेटके फेकण्याबाबत सिंगापुरात खूप कठाेर नियम अाहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास १५ हजार रुपयांपर्यंत दंड ठाेठावला जाताे. तसेच ब्रिटनमध्ये सात हजार, तर फ्रान्समध्ये धावत्या वाहनाच्या खिडकीतून सिगारेटची थाेटके फेकल्यास पाच हजार रुपयांचा दंड अाकारला जाताे.

बातम्या आणखी आहेत...