आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा यांना कन्यारत्न; ‘पीएम’ असताना आई झालेल्या बेनझीर भुत्तोंनंतरच्या दुसऱ्या नेत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन- न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांनी पहिल्या अपत्यास जन्म दिला आहे. नवजात मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांनीच ही माहिती दिली. देशात सर्वाेच्च पदावर असताना आई झालेल्या जेसिंडा जगातील दुसरी महिला ठरली. यापूर्वी पाकिस्तानच्या बेनझीर भुत्तो १९९० मध्ये पंतप्रधानपदी असताना आई झाल्या हाेत्या. अपेक्षित तारखेनंतर चार दिवसांनी जेसिंडा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३७ वर्षीय जेसिंडा ऑर्डर्न ६ आठवड्याच्या प्रसूती रजेवर होत्या. त्यांचा कार्यभार उपपंतप्रधान विन्स्टन पीटर यांच्याकडे आहे. 


जेसिंडा कार्यालयात येत नसल्या तरी तरी त्या घरी बसूनही कार्यरत आहेत. रजेवर जातानाच त्यांनी आपण घरी बसून मंत्रिमंडळाचे निर्णय व कामकाजाची माहिती घेत राहू, असे सांगितले होते. गुरुवारी रुग्णालयातून आपली मुलगी व पतीसोबत फोटो शेअर करून जेसिंडा यांनी ‘मी स्वत:ला खूप नशीबवान मानते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही धन्यवाद देते.’ मुलीचे वजन ३.३१ किलो असून तिची प्रकृती उत्तम आहे. माता-पिता झाल्याची जी भावना असते तीच आमचीही आहे, असे म्हटले अाहे. 


जेसिंडा पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांना विचारण्यात आले होते की, ‘तुम्ही भविष्यात आई व्हाल तेव्हा पंतप्रधान म्हणून जबाबदारी कशी सांभाळताल?’ यावर तीव्र प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या, ‘मी इतर महिलांप्रमाणेच मल्टिटास्किंगमध्ये सक्षम आहे. असे प्रश्न खरे तर विचारले जायला नकोत.’


बख्तावरनेही दिल्या शुभेच्छा...
37 वर्षीय जेसिन्डा अर्डर्न यांनी इंस्टाग्रामवर सांगितले, की "गुरुवारी संध्याकाळी 4.45 वाजता मी एका मुलीला  जन्म दिला आहे. तिचे वजन 3.31 किलोग्रॅम इतके आहे. मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना धन्यवाद." त्यांनी जानेवारी महिन्यात सोशल मीडियावरून आपण आई होणार ही बातमी दिली होती. त्यावेळी बख्तावर भुत्तो यांनी ट्वीट करून अर्डर्न यांना शुभेच्छा दिल्या. अर्डर्न यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये न्यूझीलंडच्या 40 व्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

 

निवडणुकीचा प्रचार सुरू असताना जन्मले बिलावल
1988 मध्ये बेनझीर भुत्तो यांनी वयाच्या 35 व्या वर्षी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.  त्यांनी जानेवारी 1990 मध्ये बख्तावरला जन्म दिला होता. पण, यापूर्वी निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाही त्यांनी 1988 मध्ये बिलावल भुत्तोला जन्म दिला होता.

बातम्या आणखी आहेत...