आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसूलमधून: उद्ध्वस्त नगरीत राहणारे लोक म्हणतात, आम्ही जगातील सर्वाधिक आनंदी माणसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र मोसूलच्या मुख्य बाजारपेठेचे आहे. हा भाग इमारतींचा ढिगाराच बनलेला आहे. येथे अलीकडेच एका खंडहर इमारतीत रेस्तराँ सुरू झाले आहे. संघर्षात शहरातील १० हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. - Divya Marathi
हे छायाचित्र मोसूलच्या मुख्य बाजारपेठेचे आहे. हा भाग इमारतींचा ढिगाराच बनलेला आहे. येथे अलीकडेच एका खंडहर इमारतीत रेस्तराँ सुरू झाले आहे. संघर्षात शहरातील १० हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

मोसूल- इराकच्या मोसूल शहरात १ कोटी लोक तीन वर्षे दहशतवादी संघटनेचे आेलीस म्हणून राहिले होते. इसिसच्या नृशंसतेच्या विरोधात संघर्ष करत होते. मोसूलला इसिसमुक्त करण्याच्या लढाईत १५ लाख लोकांचा मृत्यू झाला. ६ महिन्यांनंतर उद्ध्वस्त शहर पूर्ववत होऊ लागलेय.


मोसूल- बगदादीने स्वत:ला येथेच जाहीर केले होते खलिफा..
मोसूल अर्थात इराकचे दुसरे सर्वात मोठे शहर. दजला नदीकिनारी वसलेले हे शहर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध होते. मात्र तीन वर्षांपूर्वी इसिसच्या वर्चस्वामुळे हे शहर आता ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आहे. याच शहरात बगदादीने स्वत:ला खलिफा म्हणून जाहीर केले होते. २३ हजार इराकी सैनिकांनी बलिदान देत गेल्या १० जुलै रोजी मोसूलला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला, असे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळेच ते स्वत:ला जगातील सर्वाधिक आनंदी माणसे असल्याचे मानतात. ‘दिव्य मराठी’ ने मोसूलच्या लोकांशी संवाद साधला. या सकारात्मक परिवर्तनावर आधारित हा वृत्तांत...  


इंग्रजीतील मसलिन शब्दातून मोसूल हे नाव पडले आहे, असे मोसूल विद्यापीठाचे प्रोफेसर अहमद वादल्लाह यांनी सांगितले. त्याचा अर्थ मखमली कपडा असा होताे. येथील लोक मखमलासारखेच आहेत. मात्र तीन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी शहरावर वर्चस्व मिळवले. शाळा, महाविद्यालयांपर्यंत सगळ्या गोष्टींना पेटवून दिले होते. आमचा प्राचीन वारसा, विचार नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. इसिसच्या शाळेत मुलांना काडतुसांनी अंकगणित शिकवले जात होते. त्यांना दहशतवादी बनवले जात होते. त्यामुळे लोकांनी मुलांना घरातूनदेखील बाहेर पडू दिले नव्हते. नऊ महिन्यांच्या भीषण संघर्षानंतर मोसूलला १० जुलै रोजी स्वातंत्र्य मिळाले. यादरम्यान हवाई हल्ले व बाॅम्बगोळ्यांनी घरे उद्ध्वस्त झाली. हजारो लोक दफन झाले. या विदारकतेने केवळ मुलेच नव्हे तर प्रत्येकालाच सुन्न करून टाकले होते. आता स्वतंत्र झालो आहोत. जर्जर झालेल्या इमारतीत आता शाळा भरू लागल्या आहेत. 

 

शाळांचे वर्ग गच्च भरू लागले आहेत. मुलांना या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. शिक्षकांसाठी हे काम कठीण आहे. कारण तेदेखील हिंसाचाराच्या घटनांतून बाहेर आले आहेत. त्यामुळे आम्ही शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देत आहोत. शिक्षकांना सावरण्यासाठी आम्ही एक प्रॉब्लेम ट्री तयार करतो. त्याची मुळे दु:खी असल्याची दाखवतो. ही मुळे आप्तस्वकीयांची हत्या, शिर कलम होणे, नुकसान, गरिबी यांचे प्रतीक आहेत. मात्र या झाडाचा शेंडा आशावाद, आनंदाची पखरण करणारा आहे. आपल्याला सर्वांना सोबत राहून हिंसाचाराला मिटवण्याचे कामही शिकायचे आहे. त्यासाठी या गोष्टी पुढे नेल्या पाहिजेत. अशा कार्यक्रमांतून, प्रशिक्षण, खेळातून आम्हाला अपेक्षित यश मिळेल, अशी आशा वाटते. 


मी शाळेत अध्यापनासाठी जातो तेव्हा त्यांच्या डोळ्यात भविष्याबद्दलची उत्सुकता दिसून येते, असे  वादल्लाह यांनी सांगितले. २८ वर्षांचे फोटोग्राफर वाय अल-बारुदी म्हणाले, मोसूलमध्ये बांधकामांना गती आली आहे. मोसूलला इराकशी जोडणारे सहा पूल उद्ध्वस्त झाले होते. त्यापैकी पाच पूल सुरू झाले आहेत. रस्ते, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठ व रुग्णालयांना प्राधान्य देण्यात आले आहे. जर्जर इमारतीतच दुकाने सुरू झाली आहेत. बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू राहते. सर्वात मोठा बदल म्हणजे रात्री उशिरादेखील महिला स्वतंत्रपणे वावरू लागल्या आहेत. महिलांनी एकत्र येऊन मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी सुरक्षित ठिकाणे सुरू झाली आहेत. त्या अनेक कार्यक्रमांतदेखील सहभागी होत आहेत. 


जीवनाला सावरण्याची लोकांमध्ये जिद्द...  
इराकमध्ये सामान्य लोक जीवनाला पूर्ववत करण्यासाठी युनिसेफने सर्वात मोठी मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे हा त्यामागील उद्देश. युनिसेफने ५७६ शाळा पुन्हा सुरू केल्या असून १७ लाख मुले धडे गिरवू लागलेत. निनेवा प्रांत व परिसरात ४० लाख मुलांना झळ बसली आहे. ही मुले मानसिक शारीरिक धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नाहीत. इराकमध्ये मानवतेला निश्चितपणे धक्का बसला आहे. परंतु येथील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक जिद्द आहे- जीवनाला पुन्हा सावरण्याची. लहान मुलांच्या डोळ्यात स्वप्ने बहरू लागली आहेत. हा अद््भुत अनुभव आहे. मला मोठे होऊन शिक्षक व्हायचे आहे, असे मुले म्हणतात. तेव्हा चांगले वाटते.

बातम्या आणखी आहेत...