आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INSIDE STORY: \'ढोंग होता सीरियातील रासायनिक हल्ला!\' तज्ज्ञांचा दावा, सविस्तर वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - यादवीग्रस्त सीरियावर अमेरिकेने ब्रिटन आणि फ्रान्सला सोबत घेऊन गेल्या आठवड्यात क्षेपणास्त्र हल्ले केले. कारण होते, की सीरियाने आपल्याच नागरिकांवर रासायनिक हल्ला केला. जगभरात असा प्रचारही झाला. पाश्चात्य मीडियासह भारतीय मीडियाने सुद्धा या कथित रासायनिक हल्ल्याचे वृत्त देत 75 महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे दावे केले. मात्र, आता सीरियात रासायनिक हल्ला झालाच नव्हता असा दावा तज्ञांनी केला. सोशल मीडियावर या दाव्याच्या समर्थनात कॅम्पेन देखील सुरू झाले. केवळ रशियाच नव्हे, तर  ब्रिटन आणि अमेरिकेतील दैनिकांसह ब्रिटिश विद्यापीठातील प्राध्यापकांनी सुद्धा रासायनिक हल्ला ढोंग असल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रासायनिक हल्ला कुणी केला हे तर दूरच राहिले. नेमका रासायनिक हल्ला झाला, याचे पुरावे सुद्धा कुणाकडेही नाहीत. 


सर्वात मोठे कारण 'ती' संस्था...
- रासायनिक हल्ला एक पूर्वनियोजित आणि लिखित नाटक होता असा दावा केला जात आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, व्हाइट हेलमेट नावाची संस्था. सर्वच माध्यमांनी रासायनिक हल्ल्याच्या बातम्या दिल्या. त्यांचा एकमेव स्रोत होती व्हाइट हेलमेट नावाची एक संस्था. याच संस्थेने केलेल्या ट्वीट आणि शेअर केलेल्या फोटोंवरून ही रासायनिक हल्ल्याची बातमी जगभर पसरली.
- सीरियात रासायनिक हल्ल्याचे पहिले ट्वीट व्हाइट हेलमेटने वेळीच डिलीट केले. त्यामध्ये या संस्थेने 200 जणांच्या मृत्यूचा दावा केला होता. पण, नंतर तो ट्वीट डिलीट करून 70 महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाला असे ट्वीट केले. 
- व्हाइट हेलमेट सीरियात बचावकार्य आणि मदतीसाठी स्थापित करण्यात आलेली एक स्वयंसेवी संस्था आहे. 2012 मध्ये सीरियात गृहयुद्धाची सुरुवात झाली, त्याचवेळी अचानक एका माजी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने लोकांच्या मदतीसाठी सीरियात व्हाइट हेलमेट नावाची संस्था स्थापित केली. 

 

पुढे वाचा, कोण आहे ब्रिटनचा हा माजी लष्करी अधिकारी, आणखी काही दावे...

बातम्या आणखी आहेत...