आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्टअटॅक नव्हे... श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून; पार्थिव शरीर मुंबईत येण्यास होणार उशिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे अंश आढळून आले आहेत. (फाइल) - Divya Marathi
श्रीदेवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अल्कोहोलचे अंश आढळून आले आहेत. (फाइल)

दुबई/ मुंबई - अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कार्डिएक अरेस्ट आल्यानंतर श्रीदेवी या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हटले आहे. खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, एका भारतीय अधिकाऱ्याला श्रीदेवीच्या एका नातेवाईकासह मर्च्युरीमध्ये बोलावण्यात आले होते. दुसरीकडे गल्फ न्यूजने फॉरेन्सिक रिपोर्टच्या हवाल्याने म्हटले आहे की श्रीदेवी यांच्या शरीरात अल्कोहोलचा अंश आढळला आहे. 

 

शनिवारी रात्री दुबईतील हॉटेलमध्ये काय झाले? 
- कपूर कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या हवाल्याने खलीज टाइम्सने म्हटले आहे, की बोनी कपूर लग्न सोहळ्यात सहभागी होऊन मुंबईला परतले होते. 24 फेब्रुवारीला ते पुन्हा दुबईत आले. सायंकाळी साधारण 5.30 वाजता जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलमध्ये ते पोहोचले. येथेच श्रीदेवी थांबलेल्या होत्या. बोनी हे श्रीदेवी यांना सरप्राइज डीनरला घेऊन जाणार होते. 
- बोनी आणि श्रीदेवी यांना उठवले. दोघांमध्ये 15 मिनीट बोलणे झाले. त्यानंतर श्रीदेवी वॉशरुममध्ये गेल्या. जेव्हा 15 मिनिट होऊनही श्रीदेवी बाहेर आल्यानाही तेव्हा बोनी यांनी बाथरुमचे दार वाजवले तर आतून रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यांनी धक्का देऊन दार उघडले तर आतमध्ये श्रीदेवी बेशुद्ध आवस्थेत बाथटबमध्ये पडलेल्या होत्या. 
- बोनी यांनी त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या मित्राला फोन केला. साधारण 9 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. 
- पोलिस आणि डॉक्टर हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांना मृत घोषित केले. 

 

मुंबईत अंत्ययात्रेची तयारी पूर्ण, पांढऱ्या रंगाच्या असतील सर्व वस्तू 

- श्रीदेवी यांचे पार्थिव अद्याप भारतात आलेले नाही. मुंबईत अंत्ययात्रेची तयारी सुरु आहे. 
- श्रीदेवी यांना पांढरा रंग खूप आवडत होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह, काही निकटवर्तीयांना सांगून ठेवले होते की माझ्या अखेरच्या क्षणी सर्व वस्तू या पांढऱ्या राहातील. त्यामुळेच अंत्ययात्रेची तयारी सुरु असताना सर्व वस्तू या पांढऱ्या रंगाच्या असतील याकडे लक्ष दिले जात आहे. 

 

मुंबईत अंत्ययात्रेची तयारी... 
- श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर खासगी विमानाने ते मुंबईत आणले जाणार आहे. अनील अंबानी यांचे प्रायव्हेट जेट दुबईला पाठवण्यात आले आहे. मुंबईतील वर्सोवा येथील बंगल्यात अंत्ययात्रेची तयारी सुरु आहे. जुहू येथील मुक्तिधाम येथे श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...