आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी उत्तर कोरियाने शस्त्रास्त्रे हटवावीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल -   सरहद्दीपासून काही अंतरावर असलेल्या व लांब पल्ल्यावरील लक्ष्य टिपण्यास सक्षम शस्त्रास्त्रे हटवण्याची मागणी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाकडे केली आहे. त्यामुळे सीमेवरील तणाव काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होईल, अशी भूमिका दक्षिण कोरियाने मांडली आहे.   


उत्तर कोरियाला शस्त्र तैनात करण्याची इच्छा असल्यास सरहद्दीपासून ३० ते ४० किलोमीटर अंतरावर ती करता येऊ शकतात, असा सल्लाही दक्षिण काेरियाने दिला आहे. गेल्या आठवड्यात आम्ही आमची स्थिती उत्तर कोरियाला कळवली आहे. उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यात अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाचा करार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची भूमिका कळवली आहे. आम्ही देखील सीमेवरील तणाव निवळावा यासाठी सरहद्दीवरील लष्कराच्या संख्येत घट केली आहे, असा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.  


दोन्ही देशांमध्ये शस्त्रास्त्र सज्जता कमी करण्यासाठी २७ एप्रिल रोजी एक करार झाला हाेता. त्या कराराची अंमलबजावणी करण्यात यावी, असा आग्रह देखील दक्षिण कोरियाने केला आहे. त्याला उत्तर कोरिया कसा प्रतिसाद देते हे महत्त्वाचे ठरणार आहे. १९५०-५३ या दरम्यान कोरिया दरम्यान युद्ध झाले होते. त्यानंतर तणाव वाढत गेला. पुढे समेटाचे अनेक प्रयत्नही झाले होते.  

बातम्या आणखी आहेत...