आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका निर्बंध हटवण्यास तयार, भेटीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर कोरियन माध्यमांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयंग - उत्तर कोरियाने अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाची तयारी दर्शवल्यानंतर अमेरिकेने सुद्धा त्यांच्यावरील निर्बंध हटवण्यावर सहमती दर्शवली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात मंगळवारी ऐतिहासिक भेट झाली. त्यानंतर उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी हे वृत्त जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत विधान जाहीर केले नाही. तरीही चर्चा सुरू असताना उत्तर कोरियावरील निर्बंध हटवण्यास सहमती दर्शवली आहे. तत्पूर्वी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले होते, की उत्तर कोरिया जोपर्यंत अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणार नाही तोपर्यंत निर्बंध असेच लागू राहतील. 


अमेरिका, उत्तर कोरियात 4 करार
71 वर्षीय ट्रम्प यांनी 34 वर्षीय किम यांना अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करण्यासाठी तयार केले आहे. ट्रम्प यांनी त्या बदल्यात संपूर्ण सुरक्षेची हमी दिली. या दोन देशांमध्ये 4 करार करण्यात आले आहेत. 

1. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शांतता आणि मैत्रीसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल.

2. उत्तर कोरिया आपले अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणार आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देश पुढे आणखी चर्चा करतील. अमेरिकेकडून माइक पॉम्पियो यात सहभागी होतील. 

3. युद्धबंदी आणि लष्करी कारवाई दरम्यान गायब झालेले सगळेच नागरिक आप-आपल्या देशात परततील. त्यांची सुटका केली जाईल. 

4. अमेरिकेने उत्तर कोरियाला आश्वस्त केले की दक्षिण कोरियासोबत दरवर्षी होणारा संयुक्त युद्ध सराव रद्द केला जाईल. या मुद्द्यावर ट्रम्प पुढील आठवड्यात चर्चा करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...