आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने दिला भेट रद्द करण्याचा इशारा, अमेरिकेवर लावले भडकावण्याचे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयंग - उत्तर कोरियाने अमेरिकेसोबतची प्रस्तावित भेट रद्द करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेट घेणार असे ठरले आहे. एवढेच नव्हे, तर 23 मे पासून उत्तर कोरियाने आपले अणुबॉम्ब चाचणी स्थळ नष्ट करणार असल्याची घोषणा केली. पण, ऐनवेळी उत्तर कोरियाने अमेरिका आपल्यावर दबाव आणत असल्याचे आरोप लावले आहेत. तसेच बहुप्रतीक्षित बैठक रद्द करू असा इशारा देखील दिला आहे. 


हे आहे कारण...
- उत्तर कोरियाचे उप-परराष्ट्र मंत्री किम क्ये ग्वान यांनी केसीएनएला स्टेटमेंट दिले आहे. त्यामध्ये किम यांनी यांनी या अचानक आलेल्या प्रतिक्रियेसाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याकडे बोट दाखवला आहे. 

- उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियातील संयुक्त युद्ध सरावाला प्रामुख्याने जबाबदार धरले. या संयुक्त युद्ध सरावांनीच कोरियन देशांना एकमेकांपासून दूर केले असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
- "भूतकाळातही अनेकवेळा आम्ही जॉन बोल्टन यांच्यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. अजुनही ते बदललेले नाहीत. त्यांनी वारंवार उत्तर कोरियावर दबाव टाकून चर्चा एकतर्फी करण्याचा डाव रचला. आजही ते उत्तर कोरियावर संपूर्ण आण्विक त्यागसाठी दबाव टाकत आहेत. किम आणि ट्रम्प यांच्यात होणाऱ्या चर्चेमध्ये सुद्धा हाच मुद्दा मांडला जात असेल तर आम्ही चर्चा रद्द करू."
- 12 जूनच्या प्रस्तावित भेटीसंदर्भात उत्तर कोरियाला खूप अपेक्षा आहेत. परंतू, अमेरिका आम्हाला दाबण्याचा किंवा आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच प्रस्तावित भेटीवर फेरविचार करावा लागेल. असे उत्तर कोरियाने स्पष्ट केले आहे. 

 

दक्षिण कोरियासोबतची चर्चा स्थगित

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासोबत होणारी उच्चस्तरीय बैठक स्थगित गेली आहे. पुढील सूचनेपर्यंत ही बैठक होणार नाही असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. राजकीय पातळीवर अतिशय सकारात्मक प्रयत्न सुरू असताना लष्कराने अडसर निर्माण केला. अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेला संयुक्त युद्ध सराव हा प्रामुख्याने उत्तर कोरियाला लक्ष्य करूनच केला जातो. हा तर आमच्या लष्कराला चिथावणी देण्याचा कट आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जॉन बोल्टन हेच जबाबदार आहेत. असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.

 

अणुबॉम्ब चाचणी स्थळ नष्ट करणार उत्तर कोरिया
उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात आपला सर्वात मोठा शत्रू दक्षिण कोरियाच्या नेत्याची भेट घेऊन सर्वांना धक्का दिला. तसेच 12 जून रोजी सिंगापूर येथे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट होणार आहे. त्या बैठकीपूर्वी 23 मे ते 25 मे दरम्यान उत्तर कोरियाने आपले प्योंगयंग येथील अणुबॉम्ब चाचणी स्थळ नष्ट करण्याची घोषणा केली. या जाहीर कार्यक्रमासाठी त्यांनी अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया आणि दक्षिण कोरियासह जगभरातील माध्यमांना इनव्हाइट पाठवले आहेत. पण, ऐन काही दिवसांपूर्वी हा नवीन वाद निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...