आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे अमेरिकेविरुद्ध चलनयुद्ध; सेऊलच्या हना बँकेत आढळली बनावट नोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल- १०० अमेरिकी डॉलरची बनावट नोट (सुपरनोट अथवा सुपरबिल) दक्षिण कोरियात सापडली. येथील बँक अधिकाऱ्यांनी ही बनावट नोट आढळल्याचे सांगितले. सध्या उत्तर कोरियावर आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्बंध लादले आहेत. याची निर्मिती उत्तर कोरियातच झाली असावी, असा प्राथमिक अंदाज दक्षिण कोरियाने वर्तवला आहे. द. कोरियाच्या केईबी हना बँकेच्या बनवाट नोटा तज्ज्ञांनी या नोटेच्या बनावटीचे विश्लेषण केले.नोव्हेंबरमध्ये सेऊल शाखेत आढळलेली १०० अमेरिकी डॉलरची नोट बनावट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  


द. कोरियाच्या माध्यमांचा उ. कोरियावर आरोप

  सेऊलमध्ये १०० अमेरिकी डॉलरची बनावट नोट आढळून आल्याचे प्रकरण माध्यमांनी गांभीर्याने घेतले असून त्यांनी उ. कोरियाचेच हे कृत्य  आहे, असा दावा केला. सर्व देशांनी संबंध व व्यापार तोडल्याने एकट्या पडलेल्या उ. कोरियाला बनावट चलन निर्मितीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे वाटू शकते, असे माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, केईबीचे बनावट नोट तज्ज्ञ जोंग यांनी म्हटले आहे की, उ. कोरियाने याची निर्मिती केली असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, पूर्वी त्यांच्या राजदूतांकडे अधिक मूल्याच्या बनावट नोटा आढळल्याची प्रकरणे समोर आलेली होती.

 

जगामध्ये प्रथमच बनावट सुपरनोट आढळली

आतापर्यंत १००  अमेरिकी डॉलरची बनावट नोट कधीच आढळून आली नव्हती. या नोट निर्मितीची प्रक्रिया, दर्जा पाहता तिची निर्मिती करणे कठीण आहे. केईबी हना बँकेचे बनावट नोट तपासणी विभागाचे  प्रमुख यी हो जोंग यांनी सांगितले की, जगामध्ये बनावट सुपरनोट आढळल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यापूर्वी निर्माण झालेल्या सुपरनोटेवर वर्ष २००१ व २००३ वर्षाची नोंद आहेे. मात्र, या बनावट सुपरनोटेवर २००६ वर्ष आहे. विशेष म्हणजे या नोटेचे मुद्रण हुबेहूब झाले आहे. शाईवरून ही बनावट असल्याचे तत्काळ लक्षात आले नव्हते. या नोटेचे मुद्रण दर्जेदार असून कोणताही सामान्य गुन्हेगार किंवा गुन्हेगारी टोळी याची निर्मिती करू शकत नाही. मुद्रणासाठी लागणारी यंत्रणा व यंत्रे अत्यंत महागड्या आहेत. सामान्य गुन्हेगारांच्या आवाक्याबाहेरचे हे काम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

 

 द. कोरिया संयुक्त लष्कर कवायतींच्या तारखांविषयी चर्चा 
दरवर्षी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त वार्षिक लष्करी कवायती फेब्रुवारीअखेरीस आयोजित केल्या जातात. फोल ईगल आणि की रिझॉल्व्ह नामक या कवायतींच्या तारखा निश्चित असतात. यंदा मात्र पायँगचांग या द. कोरियातील प्रदेशात हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे. ९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ऑलिम्पिक व त्यानंतर पॅरालिंपिक स्पर्धा येथे होतील. उत्तर कोरियाचे क्रीडापटूदेखील यात सहभागी होतील, अशी द. कोरियाला आशा आहे. १९८८ नंतर उत्तर कोरियाने पायँगचांग ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे बंद केले होते. २०१८ मध्ये उत्तर कोरिया यात सहभागी होईल का, याविषयी अद्याप स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, सेऊल प्रशासनाने लष्करी कवायती १८ मार्चनंतर घ्याव्यात, अशी विनंती वॉशिंग्टन प्रशासनाला केली.  काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केले. मात्र, द. कोरियाचे संरक्षणमंत्री चोई ह्यून सो यांनी उभय देशात आैपचारिक चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...