आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे अवघ्या 10 रुपयांत भाड्यावर मिळतेय Girlfriend; ही एक अट करावी लागेल पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रत्येक तरुणाला वाटते की आपलीही एक गर्लफ्रेंड असावी. जिच्यासोबत फिरता, मूव्ही पाहता आणि जेवता येईल. परंतु, सर्वांना ते शक्य होत नाही. काही तर देवाकडे आपल्याला सिंगल मारू नकोस अशा प्रार्थनाही करतात. अशाच सिंगल युवकांसाठी एक नवीन ऑफर आली आहे. या ऑफरमध्ये काही अटींचे पालन केल्यास आपल्याला भाड्यावर गर्लफ्रेंड मिळणार आहे. अनेक मुलींचे पर्याय दिले जातील. त्यापैकी आपण एकीची निवड करू शकता, तेही फक्त 10 रुपयांमध्ये... परंतु, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर नेमकी कुठे आहे ही ऑफर आणि कशा आहेत अटी ते आपण पाहणार आहोत.


येथे मिळतेय ही ऑफर...
>> चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनच्या हेयुआन शहरात असलेल्या व्हाइटॅलिटी सिटी शॉपिंग मॉलमध्ये ही ऑफर दिली जात आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश करताच काचेच्या शोकेस जवळ आपल्याला सुंदर-सुंदर मॉडेल्स उभ्या दिसतील. त्यापैकी कुणाचीही निवड करता येईल. प्रत्येक मॉडेलच्या हातात एक स्मार्टफोन आहे. त्या स्मार्टफोनमध्ये QR Code स्कॅन करून 10 रुपयांची फी भरावी लागले. 
>> फक्त 10 रुपये भरल्यानंतर आपल्यासोबत ती तरुणी पुढील 20 मिनिटे मॉलमध्ये सोबत राहणार आहे. शॉपिंग करत असताना आपण तिच्यासोबत कुठल्याही शॉपमध्ये जाऊ शकता. सोबतच तिला डिनर किंवा कॉफीसाठी विचारू शकता. एवढेच नव्हे, तर हवे असल्यास तिच्या हातात आपले शॉपिंग बॅग सुद्धा देऊ शकता. ती शॉपिंग करताना तुमची मदत करेल. 20 मिनिटांची वेळ संपली, तरी चिंता नाही. पुन्हा तिच्या मोबाईलमध्ये 10 रुपये भरा आणि आणखी 20 मिनिटे तिच्यासोबत राहू शकाल. अन्यथा वेळ संपल्यावर ती पुन्हा त्या शोकेसमध्ये जाऊन उभी राहील. 


अशा आहेत अटी...
> ज्या शॉपिंग मॉलमध्ये ही ऑफर सुरू आहे, त्यातच या तरुणींसोबत फिरता येईल. शॉपिंग मॉलच्या बाहेर घेऊन जाता येणार नाही. 
> 20 मिनिटांसाठी गर्लफ्रेंड झाली तरी तिला हात सुद्धा लावता येणार नाही. तिच्या परवानगीशिवाय कुणीही टच करू नये असे स्पष्ट निर्देश आहेत. तिची परवानगी असल्यास गोष्ट वेगळी. 
> शॉपिंग मॉलने ही ऑफर जास्तीत-जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच गर्दी वाढवण्यासाठी सुरू केली आहे. त्यामुळे, केवळ चीनच नव्हे, तर जगभरात या मॉलच्या चर्चा आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...