आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही कपलने लग्नानंतर शेअर केले पहिले फोटो; सोबत क्वीनसह दोघांचे पालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लग्नानंतर ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स झालेले हॅरी आणि मेघनने आपले पहिले ऑफिशिअल फोटो म्हणून तीन छायाचित्रे जारी केली आहेत. हे फोटो त्यांच्या लग्नात अधिकृत फोटोग्राफर Alexi Lubomirski यांनी घेतले आहेत. यामध्ये हे शाही जोडपे ब्राइड्समेड्स, जवळचे मित्र-परिवार आणि क्वीनसोबतही दिसून आले आहेत. त्यापैकीच एका पोर्ट्रेटमध्ये शाही कपल आपल्या पालकांसोबत आहेत. त्यामध्ये मेघन यांच्या आई सुद्धा शाही कुटुंबियांसोबत पोझ देत आहेत. केन्सिंगटन पॅलेसने जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, या अधिकृत पोर्ट्रेट्सवर क्वीन अतिशय आनंदी आहेत. 


लुबोमिर्स्की एक फॅशन फोटोग्राफर असून सेलिब्रिटींमध्ये ते सर्वांचे आवडते आहेत. क्वीन आणि शाही घराण्यातील फोटो काढण्यासोबतच त्यांच्या क्लाइंटमध्ये जुलिया रॉबर्ट्स, निकोल किडमन, स्कार्लेट जोहान्सन, बियोन्स अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्यांचे फोटोशूट Vogue आणि Harpers Bazaar अशा मॅगझीनमध्ये लोकप्रीय आहेत. 


पुढे पाहा, आणखी दोन फोटो...

बातम्या आणखी आहेत...