आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल संपन्न मुस्लिम देशातही 20 टक्के जनता अतिशय गरीब; पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सौदी अरेबियाचे नाव जगात श्रीमंत देश म्हणून घेतले जाते. सुपर रिच लोकांचा सर्वात मोठा अड्डा म्हणूनही या देशाची ख्याती आहे. पण या धनाढ्य देशातही 20 टक्के जनता अतिशय हलाखीचे आयुष्य जगत आहे. ती गरीबी माध्यमांसमोर कधीच येत नाही. लंडनचे फोटोग्राफर लिन्से एडेरियोने   यांनी सौदीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे काही फोटो टिपले.


गरिबी लपवते या देशातील सरकार...
- रियाधमधील लग्झरी शॉपिंग मॉल्ससोबतच राजधानीतील स्लम्सची लांबच लांब रांग स्पष्ट दिसून येते. गरीब आणि विकास यावर लिहिणारे सौदीचे स्कॉलर रोसी बशीर यांच्या माहितीनुसार, येथील देशातील सरकार गरीबी लपवते.
- बशीर यांच्या माहितीनुसार, येथेही लोक अन्नावाचून तडफडतात आणि श्रीमंत लोकांना गरिबांचा त्रास दिसतच नाही.
- सौदी सरकार आपल्या देशातील गरीब जनतेचा मोजकाच व मर्यादित ऑफिशियल आकडेवारी जारी करते. तर, प्रेस रिपोर्ट आणि प्रायवेट संस्थांच्या अहवालानुसार, 20 ते 40 लाखांची लोकसंख्या दर महिन्याला 530 डॉलरपेक्षा कमी पैशात आपले जीवन जगतात.
- सरकारी आकडेवारीनुसार, देशात गरिबी वाढण्याचे कारण हे आहे की, तेथे बेरोजगार तरूणांची संख्या वाढत चालली आहे.


जेव्हा सरकारी माध्यमांनी दाखवली दरिद्री...
- गार्डियनच्या रिपोर्टनुसार, सौदीत 2002 पर्यंत स्टेट मीडियासाठी गरिबी हा एक असा मुद्दा होता, जो दाखवायला ते कचरायचे. 
- किंग अब्दुल्लाहने जेव्हा देशाची सत्ता हातात घेतली तेव्हा त्यांनी रियादमधील स्लम भागाचा दौरा केला होता. 
- तेव्हा न्यूज कवरेजवर सौदीतील अनेक लोकांनी देशातील गरिबी प्रथमच पाहिली होती. 
- यानंतर प्रिन्स सुल्तान बिन सलमान यांनी देशात गरिबीची समस्या असल्याचे मान्य करत ती दूर करणार असल्याचे म्हटले होते. 
- त्यांनी तीन ते पाच वर्षात इकोनॉमिक डेवलपमेंटद्वारे गरिबी नष्ट करू असे म्हटले होते. 
- सरकारद्वारे कित्येक अब्ज डॉलर दर वर्षी लोकांच्या एज्युकेशन आणि हेल्थकेयरवर खर्च केले जात आहेत. 
- याशिवाय सरकारकडून प्रत्येक महिन्याला पेन्शनसोबतच अन्नधान्य आणि वीज बिले भरली जातात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, सौदीतील दारिद्र्य दाखवणारे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...