आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: कडाक्याच्या थंडीत Pant न घालताच निघाल्या तरुणी, असा होता नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - लंडनच्या मेट्रो आणि सबवे स्टेशनवर रविवारचा नजारा पाहून सगळेच अवाक झाले. चक्क 3 अंश सेल्सियसच्या तापमानात पुरुष आणि महिलांनीही पॅन्ट घातलेच नव्हते. त्यातही बहुतांश लोक विचित्र अंडरवेअरमध्ये दिसून आले. प्रत्यक्षात हे सगळेच नो पॅन्ट डे साजरा करत होते. 

 

अशी झाली सुरुवात...
- 16 वर्षांपूर्वी No Pants Day साजरे करण्याची सुरुवात एक प्रँक (मस्करी) म्हणून न्यूयॉर्क येथे झाली. यात 7 जणांना पॅन्ट न घालता रस्त्यांवर उतरून सर्वांना अचंभित केले. तेव्हापासूनच हा अजब दिन साजरा केल्या जातो. आता या फेस्टिव्हलचा उत्साह जगभरातील 60 शहरांमध्ये दिसून येतो. लोकांना हसवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. 
- लंडनच्या वाहतुकीचे प्रमुख साधन सबवेमध्ये लोक अंडरवेअर घालून प्रवास करताना दिसून आले. जवळपास 400 जणांना यात सहभाग घेतला होता. यात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. 
- या इव्हेंटची माहिती अधिकृतरीत्या फेसबूकवर जारी करण्यात आली होती. यात सहभागी होणाऱ्यांना ग्रुप लीडरचे आदेश मानावे लागतात. कित्येकवेळा ग्रुप लीडर सर्वांना भर रस्त्यावर नेऊन अचानक आपल्या पॅन्ट काढण्याचे आदेश देतो. 

 

असे आहेत नियम
इव्हेंटमध्ये सहभाग घेणाऱ्यांना काही नियमांचे पालन करावे लागते. यात रेल्वेतील वर्तन नेहमीसारखेच ठेवणे, त्यांना हवे असल्यास दोन अंडरगार्मेंट्स घालू शकतात. पण, त्यामुळे आपल्या जवळपासच्या लोकांना त्रास होता कामा नये.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, नो पॅन्ट्स डे फेस्टिव्हलचे आणखी काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...