आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी हि-यांची खाण होती ही जागा, यामुळे झाली अशी अवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण आफ्रिकेतील नामिब वाळवंटात कोलमन्सकोप नावाचे एक शहर आहे. वाळवंटाच्या मध्यभागी वसलेल्या या शहराची जगभरात हिऱ्यांची खाण म्हणून ख्याती होती. पण, हळू-हळू या खाणीत हिरे सापडणे बंद झाले. त्यामुळे, येथील स्थानिकांनी आपली घरे आणि उद्योग सोडून दुसऱ्या शहरांत स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला. तरी या शहरात आजही पर्यटक आणि फोटोग्राफर्सला खास आकर्षण आहे. वाळवंटात दबती घरे आणि उद्ध्वस्त झालेल्या शहराचे चित्र टिपण्यासाठी ते या ठिकाणी येतात. 


असा लागला हिऱ्यांचा शोध...
- कोलमन्सकोप शहराचा शोध 20 व्या शतकात लागला. त्यावेळी येथील वाळवंटात बसलेल्या एका व्यक्तीला अचानक हिरा सापडला. 
- 1908 मध्ये तर रेल्वे रुळ खोदकाम सुरू असताना एका कामगाराला एक मोल्यवान दगड सापडला. त्याने तो दगड आपल्या वरिष्ठाला दाखवला. तेव्हा या ठिकाणी हिऱ्यांची खाण असल्याचा पत्ता लागला. 
- डायमंड माइन असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि अवघ्या काही वर्षांत या वाळवंटात जणू शहर उभे ठाकले. शेकडो घरे बांधण्यात आली.
- त्यावेळी जर्मनीहून सुद्धा लोक या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली. जर्मन लोक शहरात वसले तेव्हा हे शहर आफ्रिकेतील सर्वात उच्चभ्रू शहर म्हणून ओळखले जात होते. 
- शाळा असो की रुग्णालय, पॉवर स्टेशन असो वा कसीनो सर्वच प्रकारच्या मनोरंजन आणि सोयी सुविधा या शहरात उपलब्ध झाल्या.


40 वर्षांत वसलेले शहर बकाल
- हिऱ्यांसाठी स्थानिकांसह परदेशी उद्योजकांनीही शहरात गर्दी केली. मोठ्या प्रमाणात खोदकाम आणि प्रक्रिया सुरू झाल्या. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अचानक येथील गर्दी कमी झाली. 
- पण, त्याच वेळी लोकांना या शहराच्या बाजूलाच दुसरेही हिऱ्यांचे शहर असल्याचे कळाले, तेव्हा पुन्हा लोकांनी त्या शहरात गर्दी सुरू केली. 
- अवघ्या 40 वर्षांत पूर्णपणे वसलेले महानगर अचानक बकाल झाले. लोक आपली घरे आणि जागा तशाच अवस्थेत सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले. 
- 1980 मध्ये कोलमन्सकोप शहरात एक संग्रहालय तयार करण्यात आले. या संग्रहालयात शहराच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ही जागा आजही शेकडो पर्यटक आणि फोटोग्राफर्सना आकर्षित करते. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आता असे दिसते हिऱ्यांचे शहर...

बातम्या आणखी आहेत...