आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामाच्या खात्म्यानंतर ओबामांना म्हणाले होते झरदारी, ही तर Good News आहे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामाला अमेरिका पाकिस्तानात घुसून ठार मारणार याची पूर्वकल्पना तत्कालीन पाक सरकारला होती. हा खुलासा अमेरिकेच्या एका वरिष्ठ माजी अधिकाऱ्याने आपल्या पुस्तकात केला आहे. अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानात घुसून लादेनला ठार मारले होते. त्यावेळी पाकिस्तानने सार्वभौमत्व आणि इतर मोठ-मोठ्या गोष्टी सांगत त्याचा निषेध केला होता. परंतु, हा निषेध वर-वरचा होता. प्रत्यक्षात, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना ओसामा ठार झाल्याची माहिती दिली होती. त्यावर झरदारींनी जी प्रतिक्रिया दिली त्यांच्यातील संभाषणाचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. 

 

- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निवडणुकीच्या प्रचारापासून सत्तेच्या 8 वर्षांपर्यंत बेन ऱ्होड्स त्यांचे सर्वात जवळचे अधिकारी आणि सहकारी होते. त्यांनीच आपले नवीन पुस्तरक 'The World as It Is: A Memoir of the Obama White House' या पुस्तकात ओबामा आणि झरदारी यांच्यातील संभाषणाचा उल्लेख केला. 
- बराक ओबामा यांनी झरदारींना फोन करून ओसामा बिन लादेन ठार झाल्याची माहिती दिली. त्यावर झरदारी म्हणाले, "काहीही असो, ही एक गुड न्यूज आहे. कित्येक दिवसांपासून आपण याची वाट पाहत होतो. ईश्वर तुमच्या आणि अमेरिकन जनतेच्या पाठीशी राहो." 
- झरदारी यांना आपण जे काही बोलतोय त्यातून पाकिस्तानी जनतेच्या भावना दुखावतील याची कल्पना होती. अमेरिकेने त्यांच्या देशात घुसून सार्वभौमत्वावर हल्ला केला याची त्यांनी माहिती होती. तरीही झरदारी या बातमीवर खुश होते. 
- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान 27 डिसेंबर 2007 मध्ये बेनझीर भुत्तो यांचा आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप पत्ता लागला नाही. माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर त्या हत्येचा खटलाही सुरू आहे. कुठल्याही राजकीय सभेत उपस्थिती न लावणारे झरदारी पत्नी भुत्तो यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये सत्तेवर आले. 


ओबामांनी वर्तवल्या होत्या 4 शक्यता
बराक ओबामा यांनी ओसामा पाकिस्तानात घुसून ठार मारण्यासाठी सैन्य पाठवण्यापूर्वी खूप विचारमंथन केले. तसेच आपल्या संरक्षण यंत्रणेला 4 गोष्टींसाठी तयार राहूनच पाकिस्तानात घुसण्याचे निर्देश दिले होते. 

1. लादेन अबोटाबादच्या त्याच घरात सापडतो आणि मोहिम फत्ते...
2. बिन लादेन घरातच आहे. परंतु, त्याच्या सहकाऱ्यांसह पाकिस्तानी सुरक्षा रक्षकही ठार मारले गेले आणि मोठा गोंधळ उडाला.
3. लादेन त्या घरात नाहीच. तरीही आपण तेथे जाऊन सुखरूप पण, रिकाम्या हाताने परत येतो.
4. लादेन तेथे नाहीच आणि पंगा झाला...


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारात सुद्धा ऱ्होड्स त्यांच्यासोबत होते. ओबामांनी आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये सांगितले होते, की ओसामाला ठार मारण्यासाठी सीमा ओलांडून दुसरीकडे जावे लागले, तरीही जाईन पण ओसामाला सोडणार नाही. ओबामांनी आपले तेच आश्वास पाळले असे ऱ्होड्स यांनी पुस्तकात लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...