आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेस्टिनी किशोरी अहेद तामिमीची आज इस्रायली लष्करी कोर्टासमोर सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाबी सालेह- पॅलेस्टिनी किशोरी अहेद तामिमीला मंगळवारी इस्रायली लष्करी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. इस्रायली सैनिकांना प्रतिकार केल्यानंतर प्रथम अहेद तामिमी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. इस्रायलच्या सैनिकांविषयी पूर्वीपासूनच पॅलेस्टिनी किशोरवयीनांमध्ये राग आहे. याचा अनुभव इस्रायलच्या सैैन्याला वारंवार आला आहे. सध्या इस्रायलच्या तुरुंगात अंदाजे ३०० पॅलेस्टिनी अल्पवयीन आहेत. तामिमीने गेल्या महिन्यात तुरुंगातच १६ वर्षे पूर्ण केली. ती सध्या पॅलेस्टिनी किशोरवयीनांच्या संतापाचे प्रतीक म्हणून जागतिक माध्यमांमध्ये गाजत आहे. तिने पॅलेस्टिनच्या भूमीवर आलेल्या इस्रायली सैनिकांना मारहाण केली होती. तिचा व्हिडिआे सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर तरुणांनी तिला आदर्श मानले होते.  


इस्रायलच्या संसदीय समितीने तिची वंश पडताळणी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ती पॅलेस्टिनी आहे का, याची खात्री करून घेतली.

 

सैनिकास मारणे फौजदारी गुन्हा   
इस्रायली सैनिकाला बुक्क्या मारणे हा फौजदारी गुन्हा असल्याचे लष्करी कोर्टाचे म्हणणे आहे. तिच्यावर सध्या खटला सुरू असून तिला दीर्घ कारावासही होऊ शकतो. गेल्या डिसेंबरात तिला मध्यरात्री तिच्या घरातून अटक करण्यात आली होते. चौकशी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तामिमीचे वडील बासेमदेखील इस्रायलविरोधी आहेत. बासेम यांना न्याय मिळण्याची खात्री आहे. 

बातम्या आणखी आहेत...