आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या मासिक पाळीवर पालकच भाड्यावर बोलावतात परपुरुष, अशीही अनिष्ट परमपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण आफ्रिकेतील मालावी या देशात अनिष्ट परमपरा आजही सुरू आहे. येथील ग्रामीण भागांत मुलीच्या पहिल्या मासिक पाळीवर पालकच परपुरुष भाड्याने बोलावतात. तसेच तिच्याबरोबर सेक्स करायला भाग पाडून कथित शुद्धीकरण केले जाते. एड्स HIV व्हायरसच्या संक्रमणातून उद्भवतो. यूएनच्या आकडेवारीनुसार, 1988 पासून आतापर्यंत जगभरात अडीच कोटींहून अधिक लोकांचा या रोगानंतर मृत्यू झाला. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती सर्वात वाइट आहे.

 

या परंपरेमुळे पसरतोय एड्स...
> दक्षिण आफ्रिकेत एचआयव्हीला आळा घालण्यासाठी सक्रीय असलेल्या पॅनोस इस्टिट्युटच्या अहवालानुसार, आफ्रिकेत सेक्शुअल क्लेन्झिंगचे प्रचलन सुरू आहे. मालावी येथे सुरू असलेल्या या परंपरेत लैंगिक पवित्रता करण्याचे प्रचलन सुरू आहे. 
> मालावीच्या अनेक भागांमध्ये पुरुष हायनची भूमिका निभावतात. त्यानुसार, हायन विधवा महिला आणि लग्नासाठी तयार असलेल्या तरुणींसोबत शारीरिक संबंध बनवतात. त्यांना खास या कामासाठी भाड्यावर घेतले जाते. 
> तरुणींचे आई-वडील स्वतः या लोकांना भाड्यावर बोलावतात. आणि त्या कामासाठी पैसे सुद्धा देतात. 
> या परंपरेत तरुणींना अशा पुरुषांसोबत सेक्स करावे लागते, ज्यांना ओळखणे तर दूर कधी पाहिलेले देखील नसते. 

> स्थानिक परंपरेनुसार, मुलींच्या पहिल्या पीरियडनंतर हा प्रकार केला जातो. यासोबत एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतरही तिला यातून जावे लागते. या शारीरिक संबंधांमध्ये एकही पुरुष किंवा स्त्री एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यास सर्वांना त्याचा संसर्ग पसरतो. 
> मालावी येथेच एक हायन पुरुष एचआयव्ही बाधित होता. त्याने गतवर्षी शंभरहून अधिक महिलांशी संबंध ठेवले. त्या सर्व तरुणी आणि विधवा महिलांना एड्स झाला. त्याला 2 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.

 

महिला करत आहेत विरोध
> मालावी येथील हा प्रकार बेकायदेशीर आहे. त्याचा वारंवार विरोध केला जात आहे. तरीही अनेक गावांमध्ये सर्रास हा प्रकार सुरू आहे. 
> मालावीच्या प्रादेशिक प्रमुख थेरेसा काचिनदामोतो यांनी या परंपेरच्या विरोधात आंदोलन उभे केले आहे. त्यांनी इतर प्रादेशिक प्रमुखांना सुद्धा या प्रथेच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. 
> याच आंदोलनानंतर मानगोची येथे आता सेक्शुल क्लेन्झिंगला पर्याय मिळाला आहे. लोक आता आपल्या मुलींच्या पहिल्या पीरियडनंतर तेलाभिषेक परंपरेचा स्वीकार करत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या प्रथेच्या नावावर सुरू असलेल्या अत्याचाराचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...