आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनाढ्यांच्या या देशात GOLD खायला लागले लोक; चहा, कॉकटेलमध्येही सोने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दुबईत राहणाऱ्या शेख आणि इतर उद्योजकांच्या सोन्याविषयीचे प्रेम जगजाहीर आहे. कपड्यांपासून कार आणि बंगल्यांपर्यंत सर्वच गोष्टींवर सोन्याचा मुलामा चढवणे ही येथील धनाढ्यांची सवय आहे. आता गत अशी झाली की येथील लोक खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये सोने टाकून त्याचे सेवन करत आहेत. फूडमध्ये सोने टाकून सर्व्ह करणाऱ्या हॉटेलांपैकी एक हॉटेल बुर्ज अल अरब सर्वात प्रसिद्ध आहे. येथे कॉकटेल, कॅफेचिनो आणि अनेक डिशमध्ये शुद्ध सोने टाकले जात आहे. 


- बुर्ज अल अरब हॉटेलचे आतील बांधकाम आणि फूड सर्वांमध्ये सोन्याची झलक दिसून येते. या हॉटेलात जवळपास 20 हजार चौरस फुटांचे 24 कॅरेट सोन्याचे एक पान लावण्यात आले आहे. येथे जेवणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक डिशमध्ये सोने टाकून खाण्यासाठी दिले जाते. 
- हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर 'गोल्ड ऑन 27' नावाचे रेस्टॉरंट आहे. त्या ठिकाणी कॅफेचिनो आणि सर्व ड्रिंक सर्वच पेयांमध्ये गोल्ड दिसून येतो. हॉटेलचे फूड आणि ड्रिंक विभागाचे व्यवस्थापक हारो सांगतात, गोल्डमध्ये कुठल्याही प्रकारची चव नसते. तरीही एक उच्चभ्रू समाजाचे लक्षण म्हणून त्यामध्ये सोने दिले जाते. 
- व्यवस्थापकांनी सांगितल्याप्रमाणे, फूड आणि ब्रेवरेजमध्ये दरवर्षी 700 ग्रॅमपेक्षा जास्त सोने वापरले जाते. गोल्ड ऑन 27 च्या सर्वात लोकप्रीय कॉकटेलमध्ये 79 एलिमेंट आहेत. विशेष म्हणजे, यात अल्कोहोल नाही. त्यामध्ये सोन्याचे तुकडे टाकले जातात. यात साखरेचे क्यूब सुद्धा सोनेरी असतात. महिन्यातून 1-2 ग्राहक असेही येतात. जे सोन्याचा मुलामा असलेल्या केकची ऑर्डर देतात. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...