आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Philippines चे राष्ट्राध्यक्ष दुतेर्ते म्हणाले, कुणी ईश्वर असल्याचे सिद्ध केल्यास लगेच राजीनामा देईन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला - आपल्या वादग्रस्त विधाने आणि निर्णयांसाठी जगभरात ओळखले जाणारे फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष दुतेर्ते यांनी आता ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यांना आव्हान दिले आहे. एखाद्या व्यक्तीने ईश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवल्यास राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन असे दुतेर्ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या भाषणात बायबलमध्ये असलेल्या एका कहाणीवर टीका केली होती. सोबतच ईश्वरासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यानंतर बहुसंख्य कॅथोलिक समाज पुढे आला. त्यांना प्रत्युत्तर देताना दुतेर्ते यांनी हे आव्हान दिले आहे. 


ईश्वर असेल तर त्याच्यासोबतचा सेल्फी आणा?
दुतेर्ते शनिवारी दावोस येथे एका विज्ञान संबंधित कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, भगवान आहे खरंच आहे का? याचा काय पुरावा आहे. एखाद्या व्यक्तीने माझ्यासमोर भगवानसोबतचा सेल्फी आणल्यास मी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देईन. काही वेळातच आपल्या विधानांवरून पलटताना ते म्हणाले, जगात ईश्वरीय शक्ती आवश्य आहे. जी शक्ती ताऱ्यांमधून मानवजातीचे रक्षण करत असते. दुतेर्ते यांनी आपल्या भाषणात ख्रिश्चन समाज आणि त्यांच्या परमपरांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. चर्चमध्ये लहान मुलांना अशुद्ध मानले जाते. तसेच त्यांच्या शुद्धीकरणासाठी पैसे आकारले जातात असे ते म्हणाले. 


दुतेर्ते यांनी वादग्रस्त विधाने करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी आपल्या देशात अमली पदार्थ तस्करी आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात एक वादग्रस्त धोरण राबविले आहे. एखाद्या व्यक्तील कुणी अमली पदार्थांचे सेवन किंवा तस्करी करताना दिसल्यास त्याला शूट करण्याचा अधिकार आहे असे धोरण त्यांनी लागू केले. एवढेच नव्हे, तर सामान्य नागरिकांच्या हातात बंदूका देऊन अशा लोकांना ठार मारण्यास प्रवृत्त केले. तत्पूर्वी 2015 मध्ये पोप आणि त्याही पूर्वी त्यांनी ओबामा यांच्यावर अभद्र शब्दात टीका केली होती. 

बातम्या आणखी आहेत...