आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षांच्या माता, वयात येण्यापूर्वीच लग्न; असे जगतात येथील टीनेज कपल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - म्यानमारमध्ये अल्पवयीन मुली गरोदर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या देशात दरवर्षी सरासरी 50 हजार अल्पवयीन मुली बाळाला जन्म देत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यापैकी बहुतांश मुलींचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आहे. अशा प्रकारच्या समस्येला सामोरे जाणारा म्यानमार पहिला देश नाही. चीनच्या ग्रामीण भागात सुद्धा हीच अवस्था आहे. युनान प्रांतात अवघ्या 13 वर्षांच्या मुली विवाहित आणि आई आहेत. 

 

फोटोग्राफरने दाखवली LIFE...
- फोटोग्राफर मुई जियाओ यांनी चीनमध्ये विवाहित अल्पवयीन कपल्सचे आयुष्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यामध्ये बाल-विवाह आणि स्थानिक प्रथांचे दर्शन घडवण्यात आले आहे. 
- मुई यूनान प्रांताच्या ग्रामीण भागांत राहून टीनेज कपल्सची भेट घेऊन आल्या आहेत. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी आई झालेल्या अल्पवयीन मुलींसोबत चर्चा केली. 
- अशाच अल्पवयीन कपलच्या भेटी घेत असताना मुई यांनी त्यांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. झी नावाची एक 13 वर्षीय मुलगी एका लेकराची आई आहे. तिचा विवाह गतवर्षी 18 वर्षीय युवकाशी लावून देण्यात आला होता. 
- येथील स्थानिकांना बर्थ कंट्रोलची माहिती नाही. शाळेतच एका सीनियर मुलासोबत डेटिंग करताना ती गर्भवती झाली. त्यामुळे तिला शाळा सोडून लग्न करावे लागले. 
- चीनमध्ये लग्नासाठी महिलेचे वय 20 वर्षे आणि पुरुषाचे वय 22 वर्षे असणे आवश्यक आहे. तरीही अशा प्रकारचे विवाह सर्रास केले जात आहेत. 
- अल्पवयीन मुले मुलींना बर्थ कंट्रोलची माहिती नसल्याने 13 वर्षांच्या मुली देखील गर्भवती होत आहेत. त्यामुळे, त्यांचे पालक विवाह लावून देत आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या टीनेज कपल्सचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...