आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - 2003 मध्ये अमेरिकेने इराक विरोधात युद्ध पुकारले. इराकचे नेते सद्दाम हुसैनवर अण्वस्त्र आणि रासायनिक शस्त्र बाळगल्याचे आरोप लावून अमेरिकेने सुळावर चढवले. पण, गेल्या 15 वर्षांपासून इराकमध्ये रासायनिक शस्त्र आणि शांतता दूर-दूर पर्यंत सापडलेले नाहीत. 20 मार्च रोजीच अमेरिकेने आपल्या सहकाऱ्यांसोबत इराकवर पहिला हल्ला केला होता. याच युद्धाच्या वेळी इटलीचे प्रसिद्ध फोटोग्राफर फ्रँको पगेटी यांनी युद्धग्रस्त क्षेत्रांमध्ये 6 वर्षे घालवली. तसेच तेथील क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
फक्त 21 दिवसांत निम्मे इराक काबिज
- इराकमध्ये रासायनिक शस्त्र असल्याचे आरोप लावून 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले होते.
- याच दिवशी अमेरिकेने इराकवर मिसाइल हल्ल्यांचा पाऊस पाडला आणि राजधानी बगदादसह प्रमुख शहरे उद्ध्वस्त केली.
- अमेरिकेने इतके हल्ले केले की फक्त 21 दिवसांमध्ये निम्म्या इराकवर त्यांनी नियंत्रण मिळवले. पण, सद्दाम हुसैन हाती लागला नाही. 2003 मध्येच 13 डिसेंबर रोजी सद्दामला एका तळघरातून अटक करण्यात आली आणि अमेरिकेने फाशीही दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इराक युद्धात स्थानिकांच्या पीडा व्यक्त करणारे काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.