आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Photographer Mihaela Noroc Releases Woman And Beauty From Around The World In New Book Atlas Of Beauty

PHOTOS: भारतापासून उत्तर कोरियापर्यंत, 53 देशांच्या महिलांचे सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीस... - Divya Marathi
ग्रीस...

इंटरनॅशनल डेस्क - जगप्रसिद्ध रोमानियन फोटोग्राफर मिहेला नोरोक हिने 4 वर्षांत जगभ्रमंती करताना घालवले आहेत. यावेळी तिने 53 देशांना भेट दिली. तसेच या देशांतील 2000 हून अधिक महिलांचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. नुकतेच मिहेलाने आपल्या फोटो संग्रहाचे एक पुस्तक \'अॅटलस ऑफ द वर्ल्ड\' प्रकाशित केले. यात इथियोपियापासून अमेरिका आणि उत्तर कोरियापासून भारतापर्यंत 500 छायाचित्रांना स्थान देण्यात आले.

 

विविधता दाखवण्याचा प्रयत्न...
फोटोग्राफरने अतिशय कमी बजेटमध्ये देशांचे दौरे केले आहेत. तिने सांगितल्याप्रमाणे, सौंदर्य कुठल्याही कॉस्मेटिक किंवा मेक-अपवर विसंबून नाही. सौंदर्याला शेप, साइज आणि रंग असे मापदंड लागू होत नाहीत. सौंदर्य हे प्रत्येक देशातील त्या-त्या नागरिकांच्या मनातील संकल्पना आहे. या फोटोजमध्ये प्रत्येक महिला सुंदर आहे. प्रत्येक फोटो त्या-त्या देशातील सौंदर्य आणि विविधता दाखवतो. हे फोटोज सध्या इंटरनेटवर सुद्धा व्हायरल होत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मिहेला यांचे फोटो कलेक्शन...

बातम्या आणखी आहेत...