आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा देश म्हणून उत्तर कोरियाला ओळखले जाते. वारंवार होणाऱ्या अण्वस्त्र आणि मिसाइल चाचण्यांमुळे जवळपास साऱ्या जगाने या देशाशी संबंध तोडले. तरीही हा देश स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवर टूरिस्ट स्पॉट म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून हुकूमशहा किम जोंग उनच्या नेतृत्वातील सरकारने 70 आणि 80 च्या दशकातील काही फोटोज जारी केल्या आहेत. यातून खास कम्युनिस्ट देशांच्या नागरिकांना पर्यटनासाठी आकर्षित केले होते. पाश्चात्य किंवा इतर देशांच्या नागरिकांना प्रवेश निषिद्ध होता.
काय आहे या फोटोजमध्ये...
> व्हिन्टेज जाहिरातींचा भाग राहिलेल्या या फोटोजमध्ये माजी नेते किम इल संग पर्यटकांना कसे देशात बोलावण्यासाठी प्रयत्न करायचे हे दाखवण्यात आले आहे.
> या फोटोजमध्ये लोक समुद्र किनारी रिलॅक्स करताना, थीम पार्कमध्ये राइड्सची मज्जा लुटताना आणि विविध पकवानांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.
> सोव्हिएत युनियनचे तुकडे होण्यापूर्वी हे फोटोज टिपण्यात आले आहेत. किम इल संगच्या काळात केवळ कम्युनिस्ट देशांच्या नागरिकांना उत्तर कोरियात प्रवेश मिळत होता.
> आजही चीन आणि रशिया वगळता कुठल्याही देशाचे नागरिक आपल्या सुट्ट्या उत्तर कोरियात घालवण्याचा विचार करत नाहीत. मात्र, देशाची अर्थव्यवस्था बहुतांशी पर्यटनावर आधारित असल्याने किम जोंग उन सुद्धा हेच फोटोज प्रसिद्ध करून पर्यटकांना बोलावण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, 70 च्या दशकातील उत्तर कोरियाचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.