आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - मालदीवचे एक रिसॉर्ट आपल्या पाहुण्यांना समुद्राच्या आत झोपण्याची मजा देण्यासाठी सज्ज आहे. कोनार्ड मालदीव रंगाली आयलंडवर 100 कोटी रुपये खर्च करून 2 मजली रिसॉर्ट बनवण्यात आले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, इमारतीचा अर्धा भाग समुद्रावर आणि अर्धा भाग समुद्राखाली आहे. समुद्रात बांधलेला हा जगातील पहिला बंगला मानला जात आहे. यावर काही काम अजुनही पूर्ण झाले नसून ते याचवर्षी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.
- मुराका नावाच्या या रिसॉर्टचा हेतू आपल्या गेस्टला समुद्रातील जीवन दाखवणे आहे. या बंगल्यात जिम, बार, पूल, क्वार्टर्ससाठी बटलर, समुद्राजवळ बाथटब आणि अंडरवॉटर बेडरुम सुद्धा आहे.
- किंग साइज बेड असलेल्या या बंगल्यातील बेडरुममध्ये बाथरुम सुद्धा आहेत. अंडरसी बंगल्याचा अर्धा भाग वरच्या भागाला जोडण्यासाठी स्पायरल पायऱ्या आहेत.
- हॉटेलचा वरचा भाग सी फेसिंग असून 550 चौरस मीटर असा प्रशस्त आहेत. तर खालचा भाग 102 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आला आहे.
- मुराका विलामध्ये एकाचवेळी 9 पर्यटक थांबू शकतील अशी क्षमता आहे. अंडरवॉटर डिझाईन स्पेशलिस्ट एम जे मर्फी या खासगी संस्थेने ते डिझाईन केले आहे.
- या व्यतिरिक्त पेम्बा आइलंडवर मान्ता रिसॉर्टमध्ये सुद्धा एक रुम अंडरवॉटर आहे. पण, बंगलाच अंडरवॉटर असलेले हे जगातील पहिले ठिकाण मानले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.