आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात धनाढ्य शहरांमध्ये हाँगकाँगचे नाव घेतले जाते. येथील प्रत्येक एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न 56,701 डॉलर (38 लाख रुपये) आहे. तरीही प्रत्यक्षात येथे राहणाऱ्या माणसांची अवस्था जनावरांपेक्षा वाइट आहे. लाखोंच्या संख्येने लोक लोखंडी तारा आणि गजाळ्यांनी बनलेल्या पिंजऱ्यांमध्ये राहतात. तर काही लोक क्युबिकल अर्थात 6*4 फुट आकाराच्या डब्यांमध्ये एका पलंगावर आपले आयुष्य घालवतात.
शवपेट्यांमध्ये राहणे देखील महाग
- राहण्यासाठी जागाच उरली नाही. असलेली घरे खूप महागडी असल्याने ते सर्वांना खरेदी करणे तर दूर भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही. साधी आरसीसीची घरे सुद्धा खूप महाग आहेत.
- अशात गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी 6 फुट लांब आणि 3 फुट रुंद अशा पिंजऱ्यांमध्ये राहण्याशिवाय दुसरे पर्याय नाही.
- पिंजरे किंवा शवपेट्या म्हटल्या जाणाऱ्या या खोल्या सुद्धा काही स्वस्त नाहीत. त्यांना या खोल्यांमध्ये राहण्यासाठी सुद्धा किमान 11,500 रुपये दरमहा द्यावे लागतात.
- सिंगल बेडरूम असलेल्या साध्या फ्लॅटच्या किंमती तर दूरच तेथे राहण्यासाठी सुद्धा सव्वा लाख रुपये मासिक भाडे द्यावे लागतात.
कधी झाली सुरुवात?
- अशा प्रकारच्या घरांमध्ये राहण्याची सुरुवात 1950 आणि 60 च्या दशकात झाली. चिनी यादवीनंतर येथे मोठ्या संख्येने शरणार्थी पोहोचले. त्यावेळी हाँगकाँग शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या पुढे गेली.
- लोकसंख्या वाढत असताना येथे राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे, लोक क्युबिकल होम्स अर्थात डब्यांमध्ये राहायला लागले.
- 1990 पर्यंत अशा प्रकारच्या घरांची संख्या हजारोंमध्ये होती. 1997 पर्यंत ती लाखांवर गेली. हाँगकाँगमध्ये पिंजऱ्यांचे घर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या घरांना कायदेशीर परवानगी नाही.
- हाँगकाँग सरकारने सांगितल्याप्रमाणे, दोन लाखांहून अधिक लोक सरकारी घरांच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी निम्मे नागरिक सिंगल आहेत. त्या सर्वांना सरकारी आवास मिळवण्यासाठी आणखी किमान 3 वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शवपेट्या आणि पिंजऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे आणखी PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.