आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी सांगितले होते फक्त 1.5 वर्ष जगणार; हे एक कोडे सोडवू शकले नाही स्टीफन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - व्हीलचेअरशिवाय एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत पृथ्वीच्या उत्पत्ती सिद्धांत मांडणारे फिजिसिस्ट प्रोफेसर स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले. स्पेस अॅन्ड टाइम, ब्लॅक होल आणि व्हाइट होल या संदर्भातील सिद्धांत मांडणाऱ्या या अवलियाने मृत्यूलाही पछाडले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी केम्ब्रिज येथील घरी त्यांचे शांततेने निधन झाले. त्यांच्यासंदर्भातील महत्वाचे फॅक्ट्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे.

 

डॉक्टरांनी सांगितले होते फक्त 1.5 वर्ष जगणार
स्टीफन हॉकिंग आपल्या ग्रॅजुएशनच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आइस स्केटिंग करताना ते अचानक पडले. गंभीर जखमी झालेल्या हॉकिंग यांना Amyotrophic Lateral Sclerosis (ALS) न्युरॉन कमी करणारा आजार झाला होता. हा कधीच बरा नाही होणारा आजार असून येत्या 1 ते 1.5 वर्षांत स्टीफन यांचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी डॉक्टरांनी केली होती. पण, या भविष्यावाणीनंतर त्यांनी मृत्यूला पछाडले आणि पुढचे 42 वर्षे जगले. स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या हयातीत अनेक संशोधन आणि सिद्धांत मांडले. पण, एक तिढा ते कधीच सोडवू शकले नाही. तो जगातील सर्वात क्लिष्ट विषय असल्याचे त्यांनी मान्य केले होते. तेही आपण त्यांच्यासंदर्भातील फॅक्ट्समध्ये जाणून घेणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, स्टीफन हॉकिंग्स यांच्या आयुष्यातील आणखी काही महत्वाचे तथ्य...

बातम्या आणखी आहेत...