आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुस्लिम देशात काही तासांपुरते पती-पत्नी होतात जोडपे; अशी झाली सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराणमध्ये नागरिकांसह परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर सुद्धा विविध प्रकारची बंधने आहेत. लग्नापूर्वी शारीरिक संबंध तर दूरच प्रियकर प्रेयसीला हातात हात घालण्याचीही परवानगी नाही. असे करणे येथे कायदेशीर गुन्हा आहे. त्याच कायद्यातून पळवाट काढण्यासाठी येथील तरुण वर्ग प्लेजर मॅरेज करतात. अशा प्रकारचा विवाह काही मिनिटांपासून 99 वर्षांपर्यंतचा असू शकतो. प्लेजर मॅरेज करण्यापूर्वी कपललाच ठरवावे लागते, की त्यांचा हा विवाह किती दिवसांचा राहणार आहे.

 

करारांवर केले जातात विवाह
> माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक भाषेत अशा प्रकारच्या विवाहाला 'सिघेह' असे म्हटले जाते. 2005 मध्ये इराणने अशा प्रकारच्या विवाहाला मंजुरी दिली आहे. 
> इराणमध्ये लग्नापूर्वी कुठल्याही जोडप्याला डेटवर किंवा हातात हात सुद्धा घालता येत नाही. असे करताना आढळल्यास चाबकाचे फटके आणि दंड आकारला जातो. 
> त्यामुळेच, इराणमध्ये तात्पुरत्या विवाहाचा प्रकार रूढ होत आहे. यात लग्नाचा कालावधी, ते किती दिवस टिकणार, मेहरची रक्कम या सर्व बाबींचे करार केले जातात. 
> हा करार संपल्यानंतर मुलीचा इतर ठिकाणी लग्न करताना एक अट आहे. त्यानुसार, तिला आपले पीरियड्स दोन वेळा येत नाही तोपर्यंत थांबावे लागते.

 

लोकांनी सांगितले अनुभव
> न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, तेहरानमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणारी मरियम हिने डेटिंगसाठी प्रियकर करीमसोबत तात्पुरता विवाह केला होता. नेहमीच एकत्रित बाहेर जात असल्याने काही अडचणी येऊ नये यासाठी त्यांनी हा विवाह केला होता. मरियमसारख्याच अनेक युवा-युवतींसाठी अशा प्रकारचे विवाह प्रशासनापासून प्रोटेक्शन आहे. 
> धार्मिक आणि कायदेशीर मंजुरी असतानाही इराणमध्ये असले विवाह लोकप्रीय नाहीत. लग्नासाठी मुलीने व्हर्जिन असणे आजही आवश्यक मानले जाते. येथील नागरिक 'सिघेह' प्रकाराला कायद्याने केलेले देहविक्रय असेही म्हणतात.

 

पुढील स्लाइड्सवर, पाहा इराणमध्ये अशी आहे दैनंदिन लाइफ...

बातम्या आणखी आहेत...