आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षांपूर्वी 12 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, नॅपकिनने उलगडली Murder Mistry

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेत रेप आणि हत्येचे 32 वर्षे जुने प्रकरण सोडवण्यात एका नॅपकिनची मदत झाली. या नॅपकिनमुळेच पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. 66 वर्षांच्या आरोपी गॅरे चार्ल्स हार्टमॅनला अटक झाली आहे. त्याच्यावर 12 वर्षांची मुलगी मिशेल वेल्चवर बलात्कार आणि तिच्या हत्येचा आरोप आहे. वॉशिंग्टन पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. 


असा लागला छडा.. 
- ही घटना वॉशिंग्टनमधील ताकोमामधील आहे. येथे 26 मार्च 1986 ला मिशेल आणि त्याच्या दोन लहान बहिणी पार्कमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी मिशेलच्या बहिणी पार्कमधील वॉशरूममध्ये गेल्या. त्या परत आल्या तेव्हा त्यांना मिशेल दिसली नाही. मिशेलची सायकल मात्र होती. त्यांनी त्यांच्या बेबीसीटरला सांगितले. त्यानंतर मुलीची आई आणि पोलिसांना सांगण्यात आले. 
- पोलिसांना घटनेच्या रात्रीच मुलीचा मृतदेह सापडला. पार्कपासून काही अंतरावर तिची हत्या झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले, पण कोणालाही अटक करू शकले नाहीत. 
- त्यानंतर पोलिसांनी पुराव्यांच्या आधारावरून पोलिसांनी एका व्यक्तीची डीएनए प्रोफाइल तयार केली. पण स्टेट आणि सेंट्रल डाटाबेसशी ती प्रोफाइल जुळली नाही. त्याचदरम्यान पोलिसांनी दोन भावांना संशयीत म्हणून हेरले त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. 


एका नॅपकिने झाला खुलासा 
- तपासात सहभागी हेर स्टीव्ह रियोपेल्ले यांनी एक भाऊ म्हणजे आरोपी हार्टमॅनचा पाठलाग एका रेस्तरॉपर्यंत केला. तो त्याठिकाणी एकाजणाबरोबर कॉपी प्यायला. त्यावेळी हार्टमॅनने नॅपकिनचा वापर केल्यानंतर तो रेस्तरॉमध्येच सोडला. 
- त्यानंतर रियोपेल्लेने हा नॅपकिन घेतला आणि वॉशिंग्टन स्टेट पॅट्रोल क्राइम लॅबोरेटरीत पाठवला. गेल्या मंगळावीर लॅबने पोलिसांना सांगितले की, नॅपकिनवर असलेले डीएनए क्राइम सीनवरील डीएनएशी मॅच झाले. त्यानंतर बुधवारी हार्टमॅनला अटक झाली. 

बातम्या आणखी आहेत...