आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्टिन बीबर, हेली बाल्डविनची Engagement; येथे वाचा कोण आहे भावी पत्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगस - कॅनडात जन्मलेला अमेरिकन पॉप स्टार जस्टिन बीबरने आपली प्रेयसी आणि अमेरिकन मॉडेल हेली बाल्डविनशी साखरपुडा केला आहे. अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, बहामास येथे फिरत असताना एका रिझॉर्टमध्ये जस्टिनने हेलीला प्रपोज केले. तिने हा प्रपोज वेळीच स्वीकारला आणि दोघांनी रिंग एक्सजेंच केली. सीएनएन आणि एंटरटेनमेंट न्यूज या दोन्ही दैनिकांसह जस्टिन बीबरच्या वडिलांनी सुद्धा या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. सोबतच, जस्टिन बीबरचे नातेवाइक सुद्धा याबाबत सोशल मीडियावर बोलताना दिसून आले आहेत. 

 

वडिलांनी दिला दुजोरा
जस्टिन बीबरचे वडील जेरेमी यांनी इंस्टाग्राम पोस्ट करताना लिहिले, भविष्याचा विचार करून मी फार उत्साही आहे. या कॅप्शनसह त्यांनी आपल्या मुलाचा आणि भावी सुनेचा फोटो पोस्ट केला. त्यामध्ये हेलीच्या हातात अंगठी स्पष्टपणे दिसून येत आहे. टीएमझेडच्या वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांपासून हेली आण जस्टिन एकमेकांना डेट करत होते. परंतु, जस्टिनने सेलेना गोमेज हिच्याशी ब्रेक-अप केला, तेव्हापासून जस्टिन आणि हेली एकमेकांच्या आणखी जवळ आले.


कोण आहे हेली बाल्डविन...
> हेली बाल्डविन अमेरिकन सुपरमॉडेल आहे. ती अमेरिकन मॅगझीन वोगसह मेरी क्लेअर आणि स्पॅनिश मॅगझीन्सच्या कव्हरपेजवर सुद्धा झळकली आहे. ती अमेरिकेतील एक टीव्ही सुद्धा सेलिब्रिटी आहे. अनेक टीव्ही शो आणि जाहिरातींमध्ये तिने काम केले आहे. 
> ती हॉलिवूड अॅक्टर आणि प्रोड्युसर स्टीफन बाल्डविनची मुलगी आहे. अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले स्टीफन यांनी प्रॉडक्शन सुद्धा केले आहे. त्यांचे बंधू अर्थातच हेलीचे काका अॅलेक बाल्डविन सध्या चर्चेत आहेत. ते एक कॉमिक कलाकार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करण्यासाठी जगभरात ओळखले जातात. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...