आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनचा शाही विवाह: प्रिन्स-प्रिन्सेस नव्हे, अाता ‘ड्यूक अँड डचेस’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन -  ब्रिटनचे युवराज हॅरी आणि अमेरिकेची अभिनेत्री मेगन मर्केल शनिवारी विवाहबंधनात अडकले. शाही परंपरेनुसार लग्नाच्या दिवशीच त्यांच्या पाठीमागे शाही बिरुद लागले. हॅरी-मेगन यांना आता प्रिन्स, प्रिन्सेस नव्हे, तर ड्यूक अँड डचेस ऑफ ससेक्स असे संबोधले जाईल. म्हणजेच ते आता ब्रिटनच्या ससेक्स साम्राज्याचे राजा-राणी झाले आहेत. लग्न बर्कशायरच्या विंडसर कॅसल चर्चमध्ये झाले. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या विवाहावर जवळपास ६०० कोटींचा खर्च करण्यात आला. यात २७४ कोटी तर सुरक्षा व्यवस्थेवर खर्च झाला.

 

भारतात अधिक उत्सुकता 

शाही विवाह सोहळ्याची सर्वाधिक उत्सुकता भारतात दिसून आली. यूकेतील मार्केट रिसर्च फर्म ‘मोरी’ने जगातील २८ देशांत सर्वेक्षण केले होते. यात लग्नाची तारीख घोषित झाल्यापासून ५५% भारतीयांनी यासंबंधीच्या बातम्या वाचण्यासाठी रुची दाखवली. ब्रिटनमध्ये हा आकडा ३४% होता. 

 

* विंडसर कॅसलमध्ये ६०० पाहुणे 

* २,५०० हून अधिक लोक चर्च गार्डनमध्ये जमले होते. 
* सर्व पाहुण्यांसाठी चहा-नाष्ट्याची सोय केली होती

* एकूण १ लाख लोक चर्चबाहेर जमले.

 

 


13 वर्षांपूर्वी याच ठिकाणी वडिलांचा दुसरा विवाह
शाही लग्नाचे सर्व विधींसाठी 101 वर्षांपूर्वी बांधलेल्या विन्डसर कासल चर्चची निवड करण्यात आली. 2005 मध्ये प्रिन्स हॅरी यांचे वडील प्रिन्स चार्ल्स यांनी याच चर्चमध्ये कॅमिला पार्कर यांच्याशी दुसरा विवाह केला होता. 13 वर्षांनंतर त्याच ठिकाणी मुलाचा पार पडला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या लग्न सोहळ्याचे काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...