आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळा मारून घायाळ करणारी बनली जगातील तिसरी सर्वात मोठी सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फक्त 26 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये आपल्या डोळ्यांनी साऱ्या जगाला घायाळ करणारी अपकमिंग दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया वर्रिअरने नवा विक्रम रचला आहे. विराटलाही मागे टाकून ती जगातील तिसरी सर्वात मोठी सेलिब्रिटी ठरली आहे. तिला अवघ्या दिवसभरातच जवळपास 6.2 लाख फॉलोअर्स मिळाले आहेत. भारतात इतक्या कमी वेळात एवढे फॉलोअर्स अद्याप कुणालाही मिळालेले नाही. तर जगात फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किम करदाशियनची स्टेप सिस्टर मॉडेल कायली जेनरनंतर ती सर्वात मोठी सेलिब्रिटी बनली आहे. व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी तिचे फक्त 1500 फॉलोअर्स होते. आता तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 17 लाख पर्यंत पोहोचली आहे. 

 

- फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसत असलेली मुलगी ही वास्तविक मल्याळम चित्रपटातील अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वर्रिअर आहे. 
- 18 वर्षांची प्रिया वर्रिअर केरळ मधील त्रिशूर येथील रहिवासी आहे. सध्या ती त्रिशूर येथील विमला कॉलेजमध्ये बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. 
- प्रियाची डेब्यू फिल्म 'Oru Adaar Love' चे गाणे 'Manikya Malaraya' ची एक व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
- हे गाणे शाळेतील टीएनएज मुलांमध्ये शूट झालेले आहे. यूट्यूबवर या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. त्यासोबतच ट्विटरवर त्याचे मीम तयार करुन शेअर केले जात आहे. 
- आतापर्यंत या गाण्याला यूट्यूबवर 4 लाखवेळा पाहिले गेले आहे. 
- उमर लुलु हा 'Oru addar Love' या चित्रपटाचा पटकथा लेखक आणि डायरेक्टर आहे. तर शान रहमानने चित्रपटाला संगित दिले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियाच्या इंस्टाग्राम व सोशल मीडियावरील आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...