आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बलात्काऱ्यांना करतात नपुंसक, इतर देशांत मिळतात अशा शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जम्मू काश्मिरच्या कठुआ बलात्काराचे पडसाद संयुक्त राष्ट्रपर्यंत उमटले आहेत. संयुक्त राष्ट्र प्रमुख अॅण्टोनियो गुटेरस यांनी दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच हा गुन्हा अतिशय भयानक असल्याचे ते म्हणाले. भारतात अजुनही बलात्काऱ्यांना कठोर शिक्षेवर फक्त विचारच सुरू आहेत. मात्र, काही देशांमध्ये बलात्काराच्या दोषींना 10 दिवसांच्या आत थेट मृत्यूदंड देण्याची आणि काही देशांत त्यांना नपुंसक करण्याची तरतूद आहे. आम्ही आपल्याला अशाच काही देशातील नियमांविषयी माहिती देत आहोत. 


इंडोनेशिया - नपुंसक करणे, मृत्यूदंड
इंडोनेशियात 2016 मध्ये झालेल्या गँगरेपनंतर एक कठोर कायदा मंजूर करण्यात आला. यानुसार, बलात्काराचे दोषी सापडलेल्या नराधमांच्या शरीरात स्त्रियांचे हार्मोन्स टाकून त्यांना नपुंसक केले जाते. तर किमान 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुद्धा दिली जाते. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याला समाजात खुले सोडले जात नाही. त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी त्याच्या शरीरात इलेक्ट्रॉनिक चिप लावली जाते. गंभीर प्रकरणांमध्ये या दोषींना मृत्यूदंड दिला जातो.


पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर देशांत बलात्काऱ्यांना मिळणाऱ्या शिक्षा...

बातम्या आणखी आहेत...