आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे पुतीन यांनी चौथ्यांदा स्वीकारली, आणखी 6 वर्षे पदावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे चौथ्यांदा स्वीकारली आहेत. गेल्या २ दशकांपासून ते या पदावर आहेत. यात आता आणखी ६ वर्षांची भर पडली आहे.

 

पाश्चात्त्य जगाला मात्र त्यांचे सत्तेत येणे रुचले नाही. भविष्यात रशियाशी संबंध सुधारण्याच्या आशा उरल्या नसल्याच्या प्रतिक्रिया पाश्चात्त्य जगातून व्यक्त झाल्या आहेत. १९९९ पासून पुतीन या पदावर आहेत. जोसेफ स्टॅलिननंतर इतक्या दीर्घकाळ पदावर राहणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांचा विजय झाला होता. ६५ वर्षीय पुतीन आता चौथ्यांदा पदावर आले आहेत.  


७७% मते त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळाली होती. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे. मात्र सध्या पुतीन यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय संकटांची मालिकाच उभी आहे. सोमवारी पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. रशियाच्या वर्तमान आणि भविष्यासाठी जे उत्कृष्ट आहे ते करणे मी माझे आद्यकर्तव्य समजतो, असे ते या वेळी बोलताना म्हणाले.  


शनिवारी पुतीनविरुद्ध झाली होती निदर्शने  : विरोधी पक्षनेते अलेक्सी नवालीन यांनी पुतीन यांना ‘झार’ असे संबोधले. (झार म्हणजे रशियातील हुकूमशहा). आम्ही झारशाही स्वीकारणार नाही, असे म्हणत १६०० आंदोलकांनी गेल्या शनिवारी तीव्र आंदोलने केली होती. युरोपीय महासंघाने रशियातील या स्थितीला अराजक म्हटले आहे.

 

भव्य शपथविधी समारंभ
शपथग्रहण करण्यासाठी व्लादिमीर पुतीन अालिशान काळ्या लिमोझिन कारमधून आले. हजारो कॅमेरे, मोबाइल कॅमेरे या वेळी त्यांच्यावर खिळले होते. आंद्रेव्ह हॉलमध्ये हा शपथविधी झाला.  

 

बातम्या आणखी आहेत...