आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hitler सुद्धा घाबरायचा भारताच्या या राजकुमारीला; ब्रिटनची Hero, टिपू सुल्तानची वंशज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - दीपिका, प्रियांकानंतर आता राधिका आपटे सुद्धा हॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले विंस्टन चर्चिल यांच्या गुप्तचर सैन्यावर हे चित्रपट आधारित आहे. याच गुप्त सैन्यात भारताची एक महिला गुप्तहेर सुद्धा होती. नूर इनायत खान नाव असलेल्या गुप्तहेराने जर्मनीचा तानाशहा हिटलरच्या नाकी नऊ आणले होते. तेही इतके की इनायतचा मृत्यू झाल्यानंतरही हिटलर आणि त्याच्या सैनिकांना तिची भीती वाटायची. नूर इनायत खानने आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण केले. 


म्हैसूरचा वाघ टीपू सुल्तानची वंशज...
> नूर इनायत खान म्हैसूरचा वाघ म्हणूनही ओळखल्या जाणारे राजा टीपू सुल्तान यांची वंशज होती. टीपू सुल्तान 1799 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढताना शहीद झाले. नूरच्या आई ऑरा एक ब्रिटिश नागरिक होत्या. तरीही नूरचे आयुष्य अमेरिकेत गेले. नूरचे वडील इनायत खान एक सूफी शिक्षक होते. ऑरा आणि इनायत यांची भेट अमेरिकेत झाली. त्यावेळी इनायत सूफी विषयावर लेक्चर देत होते. या दोघांचा विवाह 1913 मध्ये झाला.

> 1 जानेवारी 1914 मध्ये मॉस्को येथे नूरचा जन्म झाला. यानंतर तिचे कुटुंब फ्रान्समध्ये स्थायिक झाले. 1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सने जर्मनीपुढे नांग्या टाकल्या. तेव्हा नूरला आपले घर सोडावे लागले. यानंतर नूर आणि कुटुंबीय लंडनमध्ये स्थायिक झाले. साऱ्या जगात दहशत माजणाऱ्या हिटलरविरोधात नूरने लढण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 1940 मध्येच तिने एअरफोर्सचे महिला विभाग जॉइन केले. येथूनच तिच्या हेरगिरीचा प्रवास सुरू झाला. 


भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिली ब्रिटिशांची साथ
त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटिशांसाठी हिटलर विरोधात लढताना नूरच्या मनात भारताविषयी तितकेच प्रेम कायम होते. हेरगिरीची ट्रेनिंग घेत असताना नूरने आपल्या आईला पत्र लिहिले होते. यामध्ये तिने लिहिले, 'मला वाटते, की महायुद्धात भारतीयांनी इंग्रजांची मदत केली. तर ते त्यांना भारताला स्वातंत्र्य द्यावेच लागेल.' WAAF (वूमन ऑक्सिलेरी एअर फोर्स) मध्ये एका मुलाखतीत बोलताना नूरने म्हटले होते, आधी मी हिटलरच्या विरोधात लढणार आहे. यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष करेन. तिच्या याच प्रामाणिकपणावरून अधिकाऱ्यांनी तिची हेरगिरीसाठी निवड केली होती. 


शेवटपर्यंत उघडले नाही तोंड...
> 1942 मध्ये नूरला स्पेशल ऑपरेशन एक्झेक्युटिव्ह (SOE) मध्ये रेडिओ ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली. याचवेळी तिला कठोर ट्रेनिंग देण्यात आली. ट्रेनिंगनंतर जुलै 1943 मध्ये नूरला हेरगिरीसाठी हिटलरच्या ताब्यात असलेल्या फ्रान्समध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी नूरला मेडलिन असे नाव देण्यात आले होते. कित्येक महिने नूरने हिटलरच्या सैनिकांना चकवा देत माहिती काढली आणि ब्रिटनला पाठवली. परंतु, ऑक्टोबर महिन्यात तिचा विश्वासघात झाला. 
> फ्रान्समध्ये नूरच्या हेरगिरीची सुरुवात करून देणाऱ्या फ्रेंच महिलेने काही पैश्यांसाठी नाझींसमोर नूरचा खुलासा केला. नाझींनी नूरला पकडले आणि अमानवीय यातना दिल्या. तरीही तिने आपले तोंड उघडले नाही. नाझींच्या हाती नूरची एक गुप्त डायरी लागली. ते ब्रिटनला चुकीची माहिती पाठवायला लागले होते. नोव्हेंबरमध्ये तिला जर्मनीत पाठवण्यात आले. या ठिकाणी सुद्धा तिला यातना देऊन माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, नूरने काहीच सांगितले नाही. 13 सप्टेंबर 1944 रोजी नूरसह इतर 2 महिला गुप्तहेरांना नाझींनी गोळ्या घालून मारले. 

बातम्या आणखी आहेत...