आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जैसा देस वैसा भेस'! परदेशात सूट-बूट देशात फाटलेला कुर्ता घालतात राहुल गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारला नेहमीच सूट बूट की सरकार अशी टीका करत असतात. आपण किती साधे आणि सरळ राहतो हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच ते आपल्या परिधानातून करतात. एका प्रचार सभेत तर त्यांनी मोदी सरकार आणि आपल्या कपड्यांची तुलना करताना सर्वांना धक्का दिला. त्यांनी भर सभेत आपल्या कुडत्याच्या खिशात हात घातला आणि तो फाटलेला आहे असे सर्वांना दाखवले. यावरून राहुल गांधी ट्रोल झाले तो भाग वेगळा. परंतु, हेच राहुल गांधी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा कुठेही कुर्ता पायजामा घालत नाहीत. प्रत्येक परदेश दौऱ्यात ते चक्क जीन्स, एकापेक्षा एक टी-शर्ट्स आणि सूट-बूट घालून फिरताना दिसून येतात. 


परदेशवारीत नाकारले एसपीजी संरक्षण
राहुल गांधी यांनी 2015 ते 2017 या दोन वर्षांमध्ये 72 दिवस परदेश दौरे केले आहेत. इकोनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तानुसार, त्यांनी या दरम्यान 6 देशांचे सर्वाधिक दौरे केले. त्यांचे हे सर्वच दौरे खासगी आणि कौटुंबिक होते. परंतु, या दौऱ्यांविषयी महत्वाचे म्हणजे, त्यांनी कुठेही स्पेशल प्रोटेक्शन गार्ड्सचे संरक्षण घेतले नाही. त्यांनी आपले संरक्षण स्वतःच करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या दौऱ्यांची गुप्तता कायम ठेवण्यासाठी तसेच सरकारच्या हस्तक्षेपाची भीती या कारणांमुळे एसपीजी संरक्षण नाकारले असे सांगितले जाते. 


पुढे पाहा, 70 हजारांची जॅकेट आणि परदेशात व देशात कसे राहतात राहुल गांधी...

बातम्या आणखी आहेत...