आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Divya Spandana Said Congresss Social Media Team Does Not Have Enough Access To Resources And Information Unlike That Of The Ruling BJP

राहुल आपले ट्वीट स्वतः लिहितात, आमच्याकडे BJP सारखे रिसोर्सेस नाहीत -दिव्या स्पंदना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केम्ब्रिज - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपले ट्वीट स्वतःच लिहितात. काँग्रेसकडे भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत कमी रिसोर्सेस आहेत. अशी स्पष्टोक्ती काँग्रेस सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना यांनी केली आहे. भाजपकडून नेहमीच राहुल गांधी यांच्या ट्वीटवरून प्रश्न केले जातात. त्यांचे ट्वीट नेमके कोण करते असे विचारले जाते. त्याचेच उत्तर दिव्या यांनी दिले आहे. दिव्या आणि भारतातील विरोधी पक्षाच्या सोशल मीडियाशी संबंधित नेते अमेरिकेत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. 

 

- सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन टीमच्या पॅनल डिस्कशनमध्ये काँग्रेस सोशल मीडिया हेड दिव्या स्पंदना सहभागी झाल्या. त्यांनी सांगितले, की "आमच्याकडे भाजपच्या तुलनेत खूप कमी रिसोर्स आहेत. त्यामुळेच, आमच्या टीमने खूप चांगले काम करून दाखवले आहे. आमची टीम पार्टी प्रेसिडेंटसाठी ट्वीट करते." 
- अमेरिकेत हा कार्यक्रम हार्वर्ड विद्यापीठातील कॅनेडी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. 
- स्पंदना पुढे म्हणाल्या, कुठलाही उत्सव असल्यास आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. ते देखील अगदी तेजीने आणि योग्य वेळी. 
- एक प्रश्न काँग्रस आणि राहुल गांधी यांना नेहमीच विचारला जातो, की राहुल आपले ट्वीट स्वतःच लिहितात की दुसरे कुणी लिहिते. त्यावर राहुल आपले ट्वीट खुद्द लिहितात असे दिव्या यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...