आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांची हत्या झाली तेव्हा कित्येक वर्षे आम्ही रागात होतो, आता दोषींना माफ केले - राहुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या 5 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी त्यांनी सिंगापूर आयआयएमच्या एल्यमनींसोबत संवाद साधला. यावेळी विचारलेल्या प्रश्नांमध्ये त्यांनी वडिल (दिवंगत माजी पंतप्रधान) राजीव गांधी यांच्या आठवणी काढल्या. राहुल गांधी म्हणाले, वडिलांची हत्या झाली तेव्हा मी आणि माझी बहिण प्रियंका कित्येक वर्षे रागात होतो. पण, आता आम्ही दोषींना माफ केले आहे. सोबतच पंतप्रधानांच्या कुटुंबात जन्मने आणि राहणे याचा अनुभव सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

 

त्या घटना आता इतिहासाचा भाग
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे राहुल गांधी म्हणाले, "या घटना घडल्या त्या इतिहासाचा भाग आहेत. तेव्हा विचारसरणी, बाह्य शक्ती आणि शंकांमध्ये संघर्ष होता. मला आजही आठवतेय, जेव्हा टीव्हीवर प्रभाकरण (लिट्टे चा माजी म्होरक्या) ला मृत पाहिले. तेव्हा माझ्यात दोन प्रकारच्या भावना आल्या. पहिली म्हणजे, या व्यक्तीला अशा प्रकारे का मारण्यात आले? दुसरी - मला प्रभाकरण आणि त्याच्या मुलांविषयी दुख वाटले. कारण, त्या मुलांच्या भावना मी समजू शकत होतो."
- "मी हिंसाचार पाहिला होता. पण, याची देखील जाणीव होती की तो (प्रभाकरण) एक माणूस होता. त्याचेही कुटुंब होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याची दोन मुले रडत होती. मला त्या सर्व गोष्टींचा विचार करून वाइट वाटले. लोकांविषयी घृणा ठेवणे किती कठिण आहे याची मला जाणीव झाली. माझी बहिण प्रियंकाच्या भावना देखील अशाच होत्या."
- 21 मे 1991 मध्ये तामिळनाडूच्या श्रीपेरम्बुदूर येथे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर लिट्टेच्या आत्मघातकी हल्लेखोराने हल्ला केला होता. 

 

वडिलांच्या मृत्यूची कल्पना होती...
- राहुल गांधी म्हणाले, "मला माहिती होते की माझ्या वडिलांचा मृत्यू होऊ शकतो. मला हे देखील माहिती होते की माझ्या आजी (इंदिरा गांधी) यांची हत्या होऊ शकते. राजकारणात आपण वाइट ताकदींना दाबण्याचा प्रयत्न करत असाल, किंवा कुणासोबत उभे ठाकत असाल तर आपल्याला मरावे लागेल."

 

पंतप्रधानांच्या कुटुंबांत जन्मलात कसे वाटते?
- पंतप्रधानांच्या कुटुंबातून असल्याचा कोणता फायदा झाला? असा प्रश्न राहुल यांनी विचारण्यात आला. तेव्हा राहुल म्हणाले, "कोणता फायदा झाला हे आपण नाणीचा कोणता पैलू आहोत यावर अवलंबून आहे. पंतप्रधानांच्या कुटुंबातून असल्याने मला तेथे खूप सुविधा मिळतात हे सत्य नकारता येणार नाही. पण, माझा मार्ग खडतर नव्हता हे देखील सांगता येणारन नाही."
- "14 वर्षांचा होतो जेव्हा माझ्या आजींचा खून झाला. ज्याने माझ्या आजीला गोळ्या घातल्या तो त्यांच्यासोबतच बॅडमिंटन खेळायचा. यानंतर माझ्या वडिलांचीही हत्या करण्यात आली."
- "आपण एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणात राहता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याभोवती 15 लोक उभे असतात. मला वाटत नाही की या काही सुविधा आहेत. या सर्व गोष्टींमध्ये ताळमेळ घालणे अतिशय कठिण आहे."

बातम्या आणखी आहेत...