आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद, युद्धात उद्ध्वस्त होण्यापूर्वी असा होता इराक, 60 वर्षांपूर्वीचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इराकला आज आयएस आणि अलकायदासारख्या दहशतवादी संघटनांनी वाळवी लावली. मात्र, 4-5 दशकांपूर्वी या देशात दहशतवादी संघटनांचा नामोल्लेखही नव्हता. शिक्षण, व्यापार आणि पर्यटनासह सर्वधर्म समभाव या देशाची ओळख होती. सद्दाम हुसैन अध्यक्ष झाल्यानंतर या देशात काही प्रमाणात जातीय हल्ले झाले. तरीही देशभर एकूणच समानता पाहायला मिळत होती. 2003 मध्ये अमेरिका आणि ब्रिटनने इराकमध्ये वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन (रासायनिक शस्त्रसाठा) असल्याचा दावा करून हल्ला केला. नंतर ते दावे खोटे निघाले. तोपर्यंत इराक जगातील सर्वात धोकादायक आणि दहशतवादग्रस्त देश म्हणून कुप्रसिद्ध झाला.

 

दर्जेदार शिक्षण
1989 च्या आकडेवारीनुसार, इराक आपल्या जीडीपीचा 6 टक्के भाग शिक्षणावर खर्च करत होता. दर्जेदार शिक्षणासाठी इराक जगभर प्रसिद्ध होता. एकेकाळी शिक्षणाच्या बाबतीत इराकला मध्यपूर्वेतील सर्वात चांगला देश म्हणूनही ओळखले जात होते.

 

बसरा होते मिडल ईस्टचे वेनिस
बसरा शहर आलीशान हॉटेल, इमारती, निसर्गरम्य वातावरण, सुंदर नद्या इत्यादींसाठी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होते. या शहराची तुलना युरोपियन शहर वेनिसशी केली जात होती.

 

1947 मध्येच ब्युटी काँटेस्ट
इराकमध्ये ब्युटी काँटेस्टच्या स्पर्धांना 1947 मध्येच सुरुवात झाली होती. मिस इराक, इराक मेडन ऑफ ब्युटी आणि मेसोपोटेमियन प्रिंसेस असे तीन वर्गात पुरस्कार दिले जात होते. 1947 मध्ये झालेल्या पहिल्या ब्युटी काँटेस्टमध्ये ज्यू महिलेला मिस इराकचा किताब देण्यात आला होता.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, 60 वर्षांपूर्वीच्या इराकचे आणखी काही फोटोज...