आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मधून बाहेर पडला विराट कोहलीचा संघ, फॅन्सने असे केले Troll

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL च्या 53 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुला 30 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये बेंगलुरूला विजयासाठी 165 धावांचे आव्हान मिळाले होते. त्याचा पाठलाग करताना विराटच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ 134 धावांवरच गारद झाला. या पराभवासोबतच IPL 2018 मध्ये आरसीबीचा प्रवास येथेच संपला. या आयपीएल सीझनमध्ये RCB ने 14 सामने खेळले. त्यापैकी 6 सामन्यांतच त्यांना विजय मिळवता आले. आरसीबी बाहेर पडताच फॅन्स भडकले. त्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. विशेष म्हणजे, कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्याच्या काही तासांतच बंगलुरुचा संघ आयपीएलमधून बाहेर पडला. हा योगा-योग असला तरीही क्रिकेटच्या चाहत्यांनी त्यावरून सुद्धा टीमला ट्रोल केले. 
 

मॅच समरी:
राजस्थान रॉयल्स- 164/5 (20 ओव्हर) (राहुल- 80, रहाणे- 33)
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु- 134 (19.2 ओव्हर) (डिव्हिलिअर्स- 53, पार्थिव- 33)
MoM- श्रेयस गोपाल (4/16 विकेट)


पुढील स्लाइड्सवर, विराटला ट्रोल करताना इंटरनेटवर आलेल्या गंमतीशीर प्रतिक्रिया...

 

बातम्या आणखी आहेत...