आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Royal Death: महाराणी एलिझाबेथच्या शोकसभेचा सराव; वाचा, काय-काय होईल निधन झाल्यास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या सर्वाधिक काळ ताज धारण करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय गंभीर आजारी आहेत. त्यांच्या आरोग्याची गंभीर दखल घेऊन सरकारने संभावित शोकसभेचा सराव केला. महाराणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्यास पार पडणाऱ्या विधींना कासल डव्ह किंवा लंडन ब्रिज असे म्हटले जाते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूच्या परिस्थितीत नेमके काय होईल याचे सराव यापूर्वीही घेण्यात आले होते. परंतु, पहिल्यांदाच अशा सरावात सर्व मंत्री (सुत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान सुद्धा) सहभागी झाले. महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यास देशभर 10 दिवसांचा शोक पाळला जाईल. यामुळे, ब्रिटनला जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल.


सरावात पहिल्यांदाच सहभागी झाले मंत्री
- महाराणी एलिझाबेथ यांचे वय 92 झाले आहे. त्यांना 2013 मध्ये गॅस्ट्रोएंटेरिटीस नावाचा आजार झाला होता. त्याचवेळी रुग्णालयात भरती देखील करण्यात आले होते. तेव्हापासूनच महाराणी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. 
- गेल्या आठवड्यात सेंट पॉल कॅथेड्रल येथे झालेल्या समारंभात आरोग्यांचे कारण दाखवून महाराणी सहभागी होऊ शकल्या नाहीत. या समारंभात महाराणी एलिझाबेथ अनुपस्थित राहण्याची ही दुर्मिळ घटना होती. त्यावरून त्या गंभीररित्या आजारी असल्याच्या चर्चांना उधाण आले. 
- ‘द संडे टाइम्स’ च्या वृत्तानुसार, महाराणींच्या आरोग्याची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी शोकसभेत सहभाग घेतला. गुप्तरित्या पार पडलेल्या या सरावात पंतप्रधान सुद्धा उपस्थित होत्या असा दावा काही माध्यमांनी केला आहे. महाराणींच्या शोक कार्यक्रमांचे सराव यापूर्वीही घेण्यात आले होते. परंतु, त्यामध्ये फक्त अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. मंत्र्यांच्या उपस्थितीत गुप्त बैठक आणि शोकसभेचा सराव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


निधन झाल्यावर काय?
> गार्डियनने महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राजमहाल आणि सरकारसह देशात काय घडेल याची माहिती दिली आहे. त्यानुसार, महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यास ब्रिटनमध्ये 12 दिवसांचा शोक पाळला जाईल. निधनानंतर सरकारच्या पहिल्याच बैठकीत नवीन राजा किंवा राणीचा निर्णय घेतला जाईल. यानंतर बकिंघम पॅलेसच्या मुख्य दारावर क्वीनच्या निधनाची नोटीस लावली जाईल. 
> ही सूचना जगभरात जाहीर केली जाईल. रेडियो आणि टीव्ही स्टेशनच्या बॅकग्राउंडमध्ये शोक संगीत वाजवले जाईल. महाराणींचे शव अंत्यदर्शनासाठी वेस्टमिंस्टर हॉलमध्ये ठेवले जाईल. येथून जगभरातील लोक त्यांना श्रद्धांजली देतील. शोक पाळले जात असताना अख्ख्या ब्रिटनचे कामकाज ठप्प राहील. सरकारी आणि खासगी वाहिन्यांवर सुद्धा मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले जातील. अशात ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला किमान 50 हजार कोटींचा फटका बसणार आहे. 


सर्वात जास्त काळ पद भोगणाऱ्या महाराणी
क्वीन एलिजाबेथ यांनी 1952 मध्ये ब्रिटनच्या शाही घराण्याचे नेतृत्व स्वीकारले. तेव्हापासून आतापर्यंत ब्रिटनमध्ये 15 सरकार आणि 13 पंतप्रधान बदलले आहेत. परंतु, शाही घराण्याचे नेतृत्व त्याच करत आहेत. त्यांचे वारसदार प्रिन्स चार्ल्स खुद्द निवृत्तीच्या वयाचे झाले आहेत. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे 1400 गार्ड्स, 200 घोडे, 400 संगीतकार आणि भरमसाठ संपत्ती आहे.

 

बातम्या आणखी आहेत...