आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहम्मद पैगंबर यांच्या वंशज आहेत महाराणी एलिझाबेथ! दैनिकाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेझथ इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या वंशज आहेत असा दावा करण्यात आला आहे. हा दावा मुस्लिम बहुल राष्ट्र मोरॉक्को येथील एका प्रसिद्ध दैनिकाने केला आहे. दैनिकाने हे वृत्त प्रकाशित करताना संशोधन आणि अभ्यासांचा दाखला दिला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल असा दावा करण्याची ही पहिली वेळ नाही. 1986 मध्ये सुद्धा एका अहवालात हा दावा करण्यात आला होता.  

 

शाही फॅमिलीच्या ग्रंथातही दावा 
- मोरॉक्कोच्या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शाही फॅमिलीच्या 43 पिढ्यांचा अभ्यास केला असता इतिहासकार सुद्धा दावा करतात की क्वीन एलिझाबेथ सेकंड खरोखर मोहम्मद पैगंबर यांच्या दूरच्या नातेवाइक आहेत. 
- ब्रिटिश वेबसाइट डेलीमेलने सुद्धा म्हटले आहे, की 1986 मध्ये बुर्केज पीराज (Burke's Peerage) मध्ये हा दावा प्रकाशित झाला होता. यास शाही घराण्याच्या वंशवेलीचे अधिकृत गाइड मानले जाते. 
- इतिहासकारांच्या मते, एलिझाबेथ द्वितीय यांची ब्लडलाइन 14 व्या शतकातील अर्ल ऑफ केम्ब्रिजशी जुळलेली आहे. ही ब्लडलाइन मध्यकालीन मुस्लिम स्पेनपासून मोहम्मद पैगंबर साहेबांच्या कन्या फातिमा पर्यंत जाते. 
- फातिमा पैगंबर मोहम्मद यांच्या कन्या होत्या. त्यांचे वंशज नंतर स्पेनचे राजा बनले होते. त्यांच्याकडूनच महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म झाला आहे. 

 

असा जोडला गेला संबंध
- मोरॉक्कोच्या दैनिकात एका अग्रलेखामध्ये हामिद अल अवनी यांनी लिहिले, की 11 व्या शतकात स्पेनच्या सॅव्हिलेचे राजा अबु अल कासिम मोहम्मद बिन अब्बाद पैगंबर साहेबांच्या कन्या फातिमा यांचे वंशज होते.
- त्यांच्या मुलीचे नाव जायदा असे होते. बुर्केज पीराजच्या अध्ययनानुसार, महाराणी मुस्लिम प्रिन्सेस जायदा यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. 
- जायदा नंतर सॅव्हिलेचे शासक अल मुतामिद इब्न अब्बाद यांच्या चौथ्या पत्नी बनल्या. त्यांना सांचो नावाचे एक मूल होते. 
- अब्बादी साम्राज्यावर हल्ला झाला तेव्हा जायदा सॅव्हिले येथे गेल्या. त्या ठिकाणी त्यांची भेट स्पेनचे राजा राजा अल्फोन्सो सहावे यांच्याशी झाली. त्याच ठिकाणी पोहचून त्यांनी धर्मपरिवर्तन केले आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यानंतर त्यांचे नाव इसाबेला असे ठेवण्यात आले. 
- यानंतर त्यांचा मुलगा सांचो यांच्या वंशजांनी थर्ड अर्ल ऑफ केम्ब्रिज रिचर्ड ऑफ कोनिसबर्ग यांच्याशी विवाह केला. अर्ल ऑफ केम्ब्रिज इंग्लंडचे राजा एडवर्ड तिसरे यांचे नातू होते. 

बातम्या आणखी आहेत...