आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने रोबोट सैन्य शक्य; मानवी आज्ञेनुसार कामे करण्याची क्षमता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- शीर्षक वाचून आश्चर्य वाटत असले तरी नजीकच्या भविष्यात अशा प्रकारचे यंत्र मानवाचे सैन्य प्रत्यक्षात पाहायला मिळू शकते. ही किमया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर करून साध्य करण्यात अमेरिकेच्या संशोधकांना यश आले आहे. मानवी आज्ञेनुसार कामे करण्याची क्षमता त्यांच्यात असेल, असा दावा करण्यात आला आहे. 

 

ऑस्टिन येथील अमेरिकन सैन्य संशोधन प्रयोगशाळेत अशा प्रकारचे सैन्य तयार करण्यात आले आहे. हे सैनिक मानवी आज्ञेनुसार निश्चित वेळेत लष्करी कारवाई करतात. त्यासाठी संशोधकांनी त्यांच्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. या तुकडीला डीप टेमर असे नाव देण्यात आले आहे. त्यात काही खेळही खेळवण्यात आले.  लष्करातील खेेळ आणि त्यातील मानवी क्षमतेचा विचार करून खेळवले जातात. या प्रशिक्षणात मात्र मानवी क्षमतेपेक्षा जास्त कठीण खेळांचा समावेश करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...