आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही सुनेला द्यावी लागायची Virginity Test; प्रिन्सेस Diana नव्हत्या अपवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकन अॅक्ट्रेस मेघन मार्कल प्रिन्स हॅरीसोबत विवाह करून ब्रिटनच्या शाही घराण्याची सून झाली आहे. शाही घराण्याची सदस्य म्हणून तिच्या सार्वजनिक आयुष्यावर काही निर्बंध लादले जातील. पण, याच रॉयल फॅमिलीच्या एका जाचक नियमापासून ती बचावली आहे. एकेकाळी शाही घराण्याची सून होण्यासाठी तरुणींना व्हर्जनिटी टेस्ट अर्थात कौमार्य चाचणी देणे बंधनकारक होते. इतिहास तज्ञांचा दावा आहे, की या वादग्रस्त प्रकारातानू प्रिन्स चार्ल्स यांच्या माजी पत्नी प्रिन्सेस डायना यांना सुद्धा जावे लागले होते. 


> टीना ब्राउन यांनी लिहिलेली बायोग्राफी 'डायना क्रॉनिकल्स' नुसार, ब्रिटनच्या शाही घराण्यातर्फे जारी करण्यात आलेला हा वादग्रस्त फतवा कित्येक वर्षे सुरूच होता. कुठल्याही तरुणीला ब्रिटिश रॉयल फॅमिलीची सून होण्यासाठी ही टेस्ट पास करणे बंधनकारक होते. 
> 1981 मध्ये ही बाब समोर आली होती. जेव्हा डायना यांच्या कुटुंबियांना ब्रिटिश रॉयल फॅमिलीला खात्री पटवून द्यावी लागली होती, की आपली मुलगी व्हर्जिन आहे. एवढेच नव्हे, तर डायनाला एकही बॉयफ्रेंड नव्हता. हेच क्वीन एलिझाबेथ यांनी तिला आपली सून म्हणून स्वीकारण्याचे सर्वात मोठे कारण होते. 
> यानंतर मात्र, हा वादग्रस्त प्रकार बंद करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रिन्स हॅरीची पत्नी झालेली मेघन हिला लग्नापूर्वी दोन बॉयफ्रेंड होते. तसेच प्रिन्स हॅरीसोबतचा विवाह हा तिचा दुसरा विवाह आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...