आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा वेचणाऱ्या मजुराला सापडला लाखोंचा रोकड, तरीही खर्च केले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये कचरा उचलणाऱ्या कंपनीसाठी काम करणाऱ्या कामगारांना एका ठिकाणावरून लाखोंचा घबाड सापडला आहे. प्रत्येकी 20 पाउंडच्या नोटांचा ढीग त्यांना कचऱ्यांमध्येच सापडला. एकूणच या नोटांची किंमत 7 हजार पाउंड अर्थात जवळपास 6.5 लाख रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, इतका पैसा रोख स्वरुपात मिळाला असतानाही कुठल्याही कामगाराने त्यावर दावा केला नाही. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या नोटांचा खच पोलिसांकडे जमा केला.

 

पुढे काय झाले...
कचरा कंपनीच्या या कामगारांच्या प्रामाणिकतेचे देशभर कौतुक होत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे तर जमा केले. पण, त्यांना या पैश्यांचा खरा मालक अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे, आता तो पैसा ते शोधून काढणाऱ्या कामगारांनाच देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. कचरा वेचणारी कंपनी क्विकर स्किपच्या व्यवस्थापकाने प्रशासनाकडे तशी शिफारसही केली. सापडलेल्या नोटा कुजलेल्या आहेत. परंतु, बँक ऑफ इंग्लंडमध्ये त्या बदलून घेण्यासाठी काहीही समस्या येणार नाही. सोबतच ही रक्कम कामगारांना वाटल्यास ते त्यांच्यासाठी बोनस ठरेल असे व्यवस्थापकाने म्हटले आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...